ब्रेकिंगमहाराष्ट्र
कुलावतंस मावळा प्रतिष्ठानच्या सदस्यांचा सत्कार
कुलावतंस मावळा प्रतिष्ठानच्या सदस्यांचा सत्कार

कुलावतंस मावळा प्रतिष्ठानच्या सदस्यांचा सत्कार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
येथील क्षत्रिय कुलावतंस मावळा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवतांडव सोहळा पार पडला.
शिवजन्मोत्सवानिमित्ताने तमाम तुळजापूर शहरवायांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणारे देखावे सादर करण्यात आले. हा देखणा सोहळा आयोजित केल्याबद्दल जगदंब फायनान्सच्या वतीने कुलावतंस मावळा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे पुष्पहार, पुष्पगुछ व कुलसवामिनी तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जगदंबा फायनान्सचे विशाल रोचकरी, शुभम क्षीरसागर, राहुल गरड, सागर गंगणे, गोविंद राऊत, रामभाऊ जाधव, वैभव भगरे, विराज कौथीबीरे, अक्षय कारंडे, ओम दरेकर, विनायक सिरसट, जयसिंग क्षीरसागर, दिनेश कापसे, आकाश पवार यांच्यासह कुलावतंस मावळा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य व शिवप्रेमी युवक उपस्थित होते.