न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

जातीपातीच्या भिंती नष्ट करून एकमेकांवर प्रेम करा-नितीन शेरखाने

जातीपातीच्या भिंती नष्ट करून एकमेकांवर प्रेम करा-नितीन शेरखाने

पेठसांगवी/न्यूज सिक्सर

समाजात सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी संत रोहिदास महाराजांनी भारतभर तेराव्या शतकात समाज परिवर्तन व मानव मुक्तीचा लढा उभा केला. माणसाचे मन पवित्र असेल तर त्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. त्यांनी भक्ती चळवळीत राहून सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. जाती-पातीच्या भिंती नष्ट करून एकमेकांवर प्रेम करा असे प्रतिवादन राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे कार्याध्यक्ष नितीन शेरखाने यांनी केले. पेठसांगवी, ता. उमरगा येथे संत रोहिदास महाराज यांची ६४७ वी जयंती संत रोहिदास महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित मंगळवार (ता. २७) रोजी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पेठसांगवीच्या सरपंच सुमनताई सुभेदार होत्या. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, महाराष्ट्र चर्मकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. गणेश कांबळे, अँड. गणपती कांबळे, हभप बालाजी महाराज कोराळकर, उपसरपंच सिराज शेख, माजी सरपंच गणेश पाटील, संजय माळी, राजेंद्र पाटील, शांतिनाथ शेरखाने, हरिभाऊ भोसले, बसवराज शिंदे, पोलीस पाटील ईश्वर सुरवसे, धोंडीराम कांबळे, प्रा. रामचंद्र सावंत, लोहाराचे पत्रकार निळकंठ कांबळे, योगेश पांचाळ, अमोल कटके, अजिंक्य मुरूमकर, महेबूब पठाण, उमेश सुरवसे, रविकिरण बनसोडे, अहमद तांबोळी, दत्तू राऊत, निर्मला देशमुख, मल्हारी बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  प्रा. डॉ. महेश मोटे म्हणाले की, संत रोहिदास महाराजांनी मूर्ती पूजा व कर्मकांडावर कडाडून विरोध केला होता. त्यांनी त्यांच्या जीवनात पोटापाण्याचा विचार न करता स्वालंबी राहून समाजातील जातिभेद नष्ट केला. सर्वजण एकच सारखे व समान आहेत. त्यासाठी त्यांनी समता, स्वातंत्र्य व बंधुता ही जीवनमूल्य इथल्या नागरिकांना मिळाली पाहिजेत ही भूमिका घेऊन सर्व जीव एकाच मातीतून बनलेली आहेत. तेव्हा मेहनत, कष्ट व श्रम याला जीवनात अधिक महत्व देऊन जगले पाहिजे. असे ते शेवटी म्हणाले. यावेळी प्रा. रामचंद्र सावंत, अँड. गणपती कांबळे, प्रा. गणेश कांबळे, लक्ष्मण कांबळे सह कांबळे कुटुंबातील अकरा मुला-मुलींनी विविध महापुरुषांवर मराठी व इंग्रजीतून मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी चर्मकार संघटनेकडून विद्यार्थी व विद्यार्थिनींना वही-पेन देवून मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश सुभेदार यांनी केले. सूत्रसंचलन सोमनाथ बनसोडे व ऐश्वर्या कांबळे तर आभार ईश्वर सुरवसे यांनी मानले. ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे