तहसील कार्यालयावर लहुजी शक्ती सेनेचा हलगी मोर्चा
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तहसील कार्यालयावर लहुजी शक्ती सेनेचा हलगी मोर्चा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
मातंग समाजाला एस सी प्रवर्गात अ, ब,क,ड करून आरक्षण द्यावे,तुळजापूर शहरातील मातंग समाजाच्या युवकांवर जीव घेणा हल्ला केलेल्या आरोपीला तात्काळ अटक करून मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी यासह आदी मागण्या करिता लहुजी शक्ती सेनेच्या वतीने लहुजी शक्ती सेनेच्या वतीने हलगी मोर्चा काढून तहसिल कार्यालयासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने दि.३१ जानेवारी रोजी बुधवारी काढण्यात आलेल्या हलगी मोर्चा ची सुरुवात आण्णाभाऊ साठे चौक ते धाराशिव रस्ता,जुना बसस्थानक चौक,सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून येऊन तहसील कार्यालयावर धडकला.यावेळी उपस्थित समाजबांधवांनी मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय आणि त्याकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष याबाबत तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या.
या आंदोलना दरम्यान मातंग समाजाला एस सी प्रवर्गात अ, ब,क,ड करून आरक्षण द्यावे,तुळजापूर शहरातील मातंग समाजाच्या युवकांवर जीव घेणा हल्ला केलेल्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी,तुळजापूर येथे साहित्यरत्न डॉ.आण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व पुतळ्याचे काम लवकर सूरू करावे, हलगी वादक कलाकार व बँड-वादक कलाकारांना शासनाकडून दरहीना पेन्शन योजना सुरू करावी या मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे,जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, उपाध्यक्ष विजयसर क्षीरसागर, भीम-आण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक सुरेश भिसे,मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण कांबळे,आकाश शिंदे,माजी नगरसेवक किशोर साठे सह आदी मातंग समाज,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.