तुळजापूर तालुक्यातील चिवरी देवस्थानाकडे जानाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणाथ दुरवस्था
सार्वजनिक बांधकाम विभाव व लोकप्रतिनिधींचे जानिव पुर्वक कायम दुर्लक्ष

तुळजापूर तालुक्यातील चिवरी देवस्थानाकडे जानाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणाथ दुरवस्था
सार्वजनिक बांधकाम विभाव व लोकप्रतिनिधींचे जानिव पुर्वक कायम दुर्लक्ष
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील चिवरी देवस्थान महालक्ष्मी देवी तालुक्यात अवकाळी पावसाने या रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. अनेक वेळा या रस्त्याने संबंधीत अधिकारी, लोकप्रतिनिधी ये – जा करीत असतांनाही दुरुस्तीकडे डोळे झाक पणा करत आहे का ? तुळजापुर तालुक्यातील चिवरी महालक्ष्मी देवी कडे जानारा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा शुक्रवार व मंगळवार लाखोच्या सख्येने अनेक भाविका येता त्या भाविकातून मागणी होत आहे लोकप्रतिनिधी फक्त निवडणूक काळात अश्वासने देतात, त्यानंतर त्यांना विसर पडतो की काय हा संशोधनाचा विषय आहे. या रस्त्यावर खड्ड्याचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य वाढले आहे. सदर रस्ता हा दोन तिन वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. संबंधीत बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दूरुस्ती बाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.
नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तुळजापुर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी चिवरी येथील महालक्ष्मी देवी च्या देवस्थान पासुन ते नळदुर्ग रोड येथील चिवरी पाटी पर्यत रोड रस्ता तात्काळ दुरुस्थ करावा या साठी अनेक भक्ता कडुन मागणी होत आहेतरी संंबंधित विभागाने याकडे लक्ष देवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.