श्री तुळजाभवानीची शाकंभरी मंचकी निद्रेश प्रारंभ
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

श्री तुळजाभवानीची शाकंभरी मंचकी निद्रेश प्रारंभ
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठा पैकी एक शक्ती पिठ श्री. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शेकडो वर्षापासून देविचे पुजारी व मंदिर संस्थान कडून अनेक वेगवेगळ्या प्रथा परंपरा, रिती रिवाज जपल्या जात आहेत. यातील एक देविला निद्रस्त होण्यासाठी असलेला पलंग. देवि वर्षातून ३ वेळा साधारण १९ ते २१ दिवस वेगवेगळ्या कालावधीत निद्रा घेत असते.
कापूस पिंजारी यांचा मान ११ पिडी पासुन चालु आहे गादी पिंजारी म्हणुन शम्मु बाशि मिया नदाफ व सहकारी कुलकर्णी तसेच यावेळी कापूस पिंजन्यासाठी महिलाही मोठया संख्यणे उपस्थित होत्या शिंपी यांची ही सातवी पिडी सध्या जनार्धन गणपतराव निकते त्यांचे नातु मंगेश निकते यांच्याकडु चालु आहे.
पलांग तयार करण्याचा माण तुळजापूरचे मराठासमाजचे पलंगे घराण्याकडे आहे यात बाळासाहेब पलंगे , आण्णासाहेब पलंगे, पांडुरंग पलंगे, कालीदास पलंगे, सुनिल पलंगे , अरूण पलंगे, राजाभाऊ पलंगे, अर्जुन पलंगे, विनोद पलंगे, पृथ्वीराज पलंगे ,तानाजी पलंगे, बब्रुवान पलंगे हे पलंगेकुंटूब वर्षानु वर्षे हि परंपरा जपत आले आहेत .
आई कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दरबारात आई राजा उदो उदोच्या जयघोषात व संबळाच्या निनादात श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस दि .११ जानेवारी वार गुरुवार रोजी प्रारंभ सांयकाळी ६ .१५ मि. आभिषेक सुरवात व आभिषेक वेळ ७ .३० ला आभिषेक बंद होतात नंतर ७ .३० पासुन ८ .३० पर्यत देवीस (हाळंद)भंडारा पुर्ण मुर्तीस लावने, देवीच्या आंगावरती दुधाने आभिषेक घातलेला चोपड निघुन जान्यासाठी हाळंद लावली जाते,नंतर मेन काढने व चांदीच्या चिपा काढने, देवीस नजर लागुनये म्हणुन पुजारी यांच्या घरातुन कनकीच्या आलेल्या आरत्या ओवाळने आरतीच्या ताटात कढधान्य मुगदाळ किंवा मुग धान्याचा व कनकीच्या शिजवलेल्या फळ यांचा नैवद्द दाखवुन ,नंतर देवी उचलुन निद्रेसाठी पुजारी पंलगावरती घेऊन जातात नंतर पंलगावरती नजर लागुने म्हणुन आरती ओवाळने, हे ८ .३७ पर्यत चालते व नंतर हाळंद कुंकु मस्तकी टिकले लावने उर्वरीत चरणा वरती टाकले जाते, चंदनाचा मळवट लावने साडी रजई पांगरून घालने हार फुले हा कार्यक्रम ९ पर्यत नंतर प्रकक्षाळ १० बंद होतात .
या महिन्यात शाकंभरी नवरात्राच्या प्रारंभी श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रा दि .११ ते १८जानेवारी अशी ८ दिवसाची देवी मंचकी निदेस असते दि .२६ ते ३ जानेवारी धार्मिक कार्यक्रम होतात.
दि .१८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता शांकभरी नवरात्राच्या महोत्सवाची घटस्थापनेने सुरुवारुत होते . श्री .तुळजाभवानी या वर्षीचे भोपे पुजारी मुख्य यजमान श्री.व सौ. विनोद सोंजी यांच्या हस्ते होणार आहे
श्री.तुळजाभवानी शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित देवीच्या मंचकी निद्रेसाठी कापूस पिंजताना महिला मोठ्या संख्येण उपस्थित होत्या व दुसऱ्या छायाचित्रात गाद्या बनविण्याचे काम सुरू असताना .
छायाचित्र – लक्षमिकांत घोडके