रेल्वे भूसंपादनास भांतब्री येथील शेतकरी मालकीच्या हक्काची जमीन देणार नाही
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

रेल्वे भूसंपादनास भांतब्री शेतकरी मालकीच्या हक्काची जमीन देणार नाही
आमचा जीव देऊ पण जमीन देणार नाही शेतकऱ्यांची भुमिका ठा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील भांतब्री येथील शेतकऱ्यांची सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे साठी जमिनीचे अन्यायकारक भूसंपादनास सर्व शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करीत दि.११ जानेवारी रोजी तलाठ्या मफित उपजिल्हाधिकारी योगेश खरमाटे यांना भांतब्री येथील सर्व शेतऱ्यांनी निवेदन दिले आहे.
या निवेदनावर असे नमूद केले आहे की,
तुळजापूर तालुक्यातील भांतब्री येथील शेतकऱ्यांची सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे साठी जमिनीचे अन्यायकारक भूसंपादनास सर्व शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करीत अशा प्रकारची अन्यायकारक प्रक्रिया भूसंपादनाची सहन केली जाणार नाही या साठी या अर्जाद्वारे सूचित करत सदरली नोटीस मधील मावेजा अन्यायकारक असून या अन्यायकारक नोटीसांना विरोध सर्व शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलण्याची परिस्थिती शासनाने शेतकऱ्यावर निर्माण केले आहे.तुळजापूर तालुक्यातील भांतब्री येथील सर्व शेतकरी मिळून भूसंपादनास आमच्या मालकीची हक्काची जमीन देणार नाही यासाठी आमचा जीव देऊ पण जमीन देणार नाही असे टोकाचे पावले उचलत शेतकऱ्यांनी संबंधित तलाठ्या मार्फत उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे या निवेदनावर संगीता देविदास गोरे यांच्यासह १३ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.