क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र
राष्ट्रीय लाठी स्पर्धेत समृद्धी डोंगरेने दोन सुवर्णपदक पटकावले

राष्ट्रीय लाठी स्पर्धेत समृद्धी डोंगरेने दोन सुवर्णपदक पटकावले
तुळजापूर/न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील समृद्धी संतोष डोंगरे हिने राष्ट्रीय लाठी स्पर्धेत दोन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. या यशाबद्दल समृद्धी डोंगरे वर कौतुकाचा वर्षांव होत आहे.
नवी दिल्ली येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियम मध्ये ०५ व ०६ जानेवारी दरम्यान झालेल्या चौथ्या राष्ट्रीय लाठी स्पर्धेत समृद्धी डोंगरे ०२ सुवर्णपदक पटकावले आहेत. यावेळी दिल्ली ऑलिंपिक चे सहसचिव दिपक अग्रवाल, महागुरू सुभाष मोहीते, लाठी इंडिया चे अध्यक्ष अजय शहा यांच्या उपस्थितीत समृद्धी डोंगरे ला पदक देऊन गौरविण्यात आले. समृध्दी डोंगरे च्या या यशाबद्दल कौतुक होत आहे.