न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ग्रामीण साहित्य वाचकांना जगण्याचे बळ देते- माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

ग्रामीण साहित्य वाचकांना जगण्याचे बळ देते- माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे

जनसेवक अमोल कुतवळ त्यांच्या मित्रमंडळाने राबवलेला हा सुरेख उपक्रम

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

ग्रामीण साहित्य वाचकांना जगण्याचे बळ देते तसेच वाचताना आनंद देण्याचे काम जे साहित्य करते ते अस्सल साहित्य असते ग्रामीण जीवनातील तसेच विविध प्रश्नावरचे ज्वलंत प्रश्न कथासंग्रहाच्या व कविता च्या माध्यमातून आपल्या देह बोलेतून व वाचकाला समजेल अशा भाषेतून साहित्यिक आपल्या भावना कथा संग्रहाच्या माध्यमातून व्यक्त करतात तुळजापूर चे युवा नेते अमोल कुतवळ त्यांच्या मित्रमंडळाने राबवलेला हा सुरेख उपक्रम असून या माध्यमातून जन्मदात्या आईचे स्मरण होते व त्यांची प्रेरणा यांचा आशीर्वाद सदैव आपणास मिळतो कथासंग्रह हे मानवाला जगण्याची दिशा दाखवते तसेच चांगल्या विचारांची देवाणघेवाण कथासंग्रहाच्या माध्यमातून होते. शेलक्या बारा हे कथासंग्रह नसून १२ वास्तव जीवनाच्या कथा आहेत असे गौरव उद्गार भारत सरकार ची माजी गृहमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी काढले.
ते स्व. सौ.छायाबाई माधवराव कुतवळ चॅरिटेबल ट्रस्ट तुळजापूर व मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने लेखक इंद्रजीत पाटील लिखित शेलक्या बारा कथा संग्रह प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री मधुकरराव चव्हाण हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अँड धीरज आप्पासाहेब पाटील, राष्ट्रपती पदक प्राप्त शिक्षक श्रीकांत पाटील, प्राध्यापक दि.बा. पाटील ज्येष्ठ साहित्यिक मारुती वाघमोडे शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक मगर जिल्हा काँग्रेसची माजी अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोकुळ शिंदे, सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक चेतन नरुटे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश हसापुरे,मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूरचे अध्यक्ष अमर हंगरगेकर उपस्थित होते.


प्रस्ताविक माधव कुतवळ यांनी करून देताना कार्यक्रमाची रूपरेषा विषयी माहिती दिली.
लेखक इंद्रजीत पाटील यांनी या काव्य कथासंग्रह प्रकाशित करण्याचा हेतू स्पष्ट करून समाजातील ,कुटुंबासाठी देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. यावेळी धीरज पाटील, श्रीकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करून प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय समारोपात मधुकर चव्हाण यांनी त्यांच्या बारा कथासंग्रहातून बोलक्या भावना व्यक्त होत असल्याचे सांगून समाजाला आज कथासंग्रहाच्या माध्यमातून समाजातील स्थितीचे वर्णन होणे अपेक्षित आहे वाचनाच्या माध्यमातून समाजावर चांगले संस्कार घडतातच त्याचबरोबर समाज परिवर्तनासाठी कथासंग्रह एक उत्तम माध्यम आहे असे स्पष्ट केले

सूत्रसंचालन कानडे यांनी तर आभार जनसेवक अमोल कुतवळ यांनी मानले कार्यक्रम यशस्वी साठी स्वर्गीय सौ छायाबाई माधवराव कोतवळ चॅरिटेबल ट्रस्ट तुळजापूर मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूर व अमोल भैया मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे