जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र हे स्वतःचे असल्याचे भासवुन महिला सरपंच झाल्या होत्या
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र हे स्वतःचे असल्याचे भासवुन महिला सरपंच झाल्या होत्या
नायब तहसिलदार यांच्या फिर्यादीवरून महिला सरपंच यांच्यावर गुन्हा नोंद.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा सार्वत्रीक ग्रामपंचायत निवडणूक सरपंच मागावर्गीय महिला या पदासाठी स्वतःची बहिण क्षिरसागर यांचे जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र हे स्वतःचे असल्याचे भासवुन शासनाची फसवणुक केल्या प्रकरणी नायब तहसिलदार यांच्या फिर्यादीवरून दि.२१ डिसेंबर रोजी वेळ ७: ३० वास्ता गुन्हा नोंद माळुंब्रा सार्वत्रीक ग्रामपंचायत निवडणूक ठिकाणी यातील आरोपी महिलेने ग्रामपंचायत सार्वत्रीक निवडणुक मध्ये झालेल्या सरपंच मागावर्गीय महिला या पदासाठी स्वतःची बहिण क्षिरसागर यांचे जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र हे स्वतःचे असल्याचे भासवुन शासनाची फसवणुक केलेली आहे. तसेच नामनिर्देशन पत्रासोबत महिला सरपंच यांनी लग्नापुर्वीचे नाव क्षिरसागर असून फसवणूक करीत लग्नानंतरचे नाव सुतार असे असुन दोन्ही नावाची एकच व्यक्ती असल्याची प्रतिज्ञापत्र १००/-रु.चे मुद्रांक पेपरवरती नोटरी करुन खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करून ग्रा. पं. निवडणुकीत उमेदवार पदास पात्र असल्याचे भासवुन शासनाची फसवणुक केली प्रकरणी श्रीमती शितल शंकरराव माजलगावकर नायब तहसीलदार तहसील कार्यालय तुळजापूर यांच्या फिर्यादीवरून
पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या आदेशानुसार गुरन – ५२२/२०२३ कलम १७१ जी, १७७,१८१ भा.दं.वि. गुन्हा दाखल करुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे हे करीत आहेत.गुन्हा घेते वेळी दि.०२/१२/२०२२ रोजी ०५.२७ वा.सु. स्पोर्टस हॉल, श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी कॉलेज तुळजापुर येथे घडले आहे.