धाराशिव तालुक्यातील बावी (का ) येथील उपसपरंच पदी सौ.राधाबाई महाडीक यांची बिनविरोध निवड
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

धाराशिव तालुक्यातील बावी (का ) येथील उपसपरंच पदी सौ.राधाबाई महाडीक यांची बिनविरोध निवड
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव तालुक्यातील बावी (कावलदरा) ग्रामपंचायत कार्यालय बावीच्या उपसरपंच पदी सौ.राधाबाई नवनाथ महाडीक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ग्रामपंचायत कार्यालय बावी (कावलदरा) ची बैठक सरपंच सौ.प्रतीक्षा रोहीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजी दूपारी २.०० वाजता संपन्न झाली या निवड प्रक्रीयेत निवडुक अधीकारी म्हणुन मंडळ अधीकारी बि. जे. मस्के यांनी काम पाहीले. तलाठी टी. के. रुपनवर व ग्रामसेवक प्रशांत गरड यांनी सहाय्य केले. या बैठकीसाठी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर तांबे, राहुल साळुंके, धिरज पाटील, सिंधुबाई वाघमारे, सुक्षाला पाटील आदी उपस्थीत होते.
उपसरपंच राधाबाई महाडीक यांच्या निवडीबद्दल सरपंच प्रतीक्षा पावार यांनी शाल, पुष्पहार व बुके देवुन सत्कार केला. यावेळी पत्रकार ज्ञानेश्वर गवळी (लटके ),रमेश जाधव, बालाजी तांबे, अरविंद पाटील, नवनाथ महाडीक, नवनाथ वाघमारे, विष्णु जाधव, संगणक परिचालक सचिन पाटील, राजेगार सेवक किशोर मुळे, योगेश महाडीक, शरद महाडीक, प्रतीक महाडीक, भैरवनाथ महाडीक, रणजीत महाडीक, संतोष उंडे, विजय तांबे आदी उपस्थीत होते.