न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

१० लाख ९४ हजार ५३० रु माल जप्त : राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू धंद्याविरुद्ध कारवाईचा बडगा

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी , तुळजापूर

१० लाख ९४ हजार ५३० रु माल जप्त : राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू धंद्याविरुद्ध कारवाईचा बडगा

दोन आरोपी फरार

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

 

राज्य उत्पादन शुल्क विभाग तुळजापूर यांनी मागील काही दिवसांपासून सापळा रचून तुळजापूर तालुक्यातील कामठा व उस्मानाबाद तालुक्यातील अनुसुर्डा येथे अवैध बनावट दारू विक्री, निर्मिती व अवैध वाहतूकीवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी, राज्य उत्पादन शुल्क, म. रा. मुंबई यांच्या आदेशान्वये सुनिल चव्हाण, संचालक, (अमलबजावणी व दक्षता) म.रा. मुंबई व श्री. पी. एच. पवार मा. विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, छत्रपती संभाजी नगर यांचे आदेशानुसार व गणेश बारगजे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली नाताळ व नववर्ष च्या पार्श्वभुमीवर पी ए मुंळे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तुळजापुर यांनी दि.२० डिसेंबर रोजी मध्यरात्री महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ नुसार कलम ६५ (अ,ब,क,ड, फ, ई), ८१,८३,९० व १०८अन्वये तुळजापर तालुक्यातील कामठा शिवार व धाराशिव तालुक्यातील अनुसुंर्डा या ठिकाणी सापळा रचुन छापा टाकुण गोवा राज्य निर्मीती चे विदेशी व बनावट (डुप्लीकेट) भेसळ मद्य मिळुण आले म्हणुन आरोपी व्यकटेश रामहरी माने वय 34 वर्षे रा अनसुर्डा., ऋषीकेश अरुण भोसले वय 21 वर्षे, रा अनसुर्डा या आरोपीना अटक करण्यात आली आहे. तसेच इतर दोन फरार आरोपीना पकडण्यासाठी पथके रवानगी करण्यात आलेली आहेत.जप्त करण्यात आलेला गोवा राज्य निर्मीती चे विदेशी व बनावट मद्य खालील प्रमाणे –

गोवा राज्य निर्मीती विदेशी मद्याचा अॅडरेल ,७५० मिली क्षमतेच्या १३०८ बाटल्या १०९ बॉक्स किंमत रु,८,३७,१२०/-

गोवा राज्य निर्मीती विदेशी मद्याचा ओ चॉईसच्या ७५० मिली क्षमतेच्या २१६ बाटल्या (18 बॉक्स) ची किंमत रु.२३,७६०/-

गोवा राज्य निर्मीती विदेशी मद्याचा रॉयल क्लासीकच्या ७५० मिली क्षमतेच्या २४ बाटल्या ची किंमत रु.२,६४०/-

एम. एम.२५-ए – झे – ९२७४ बजाज कंपनीची दोन चाकी सी टी मोटारसायकल रु. ५३,७६०/-

हिरो कंपनीची दोन चाकी स्पेल्डर मोटारसायकल चेसी नंबर MBLHA10AMEHA18323

( दोन बॉक्स) किंमत गोवा राज्य निर्मीती विदेशी मद्याचा अॅडरेल १८० मिली क्षमतेच्या ३३६ बाटल्या (७ बॉक्स) विदेशी दारु चे बाटल्याचे बनावट २२५ बुचे रु,१,१०,०००/-.,रुपये ६५,००/-.,रुपये २२५०/-.,एकुण मुददेमाल किंमत- रू.१०,९४,५३०/- किंमत अंदाजे

वर्णनाचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.सदरील या कारवाईमध्ये गणेश बारगजे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उस्मानाबाद पवन मुळे निरीक्षक, तुळजापूर, तानाजी कदम, निरीक्षक, भ.प धाराशिव शिवाजी कोरे, दुय्यम निरीक्षक, पी जी कदम, दुय्यम निरीक्षक, कर्मचारी सर्व आर आर गिरी, दुय्यम निरीक्षक, व्ही ए हजारे, राहुल चांदणे, देशमुखे, राजेंद्रसिंह ठाकुर, आविनाश गंवडी, जवान नि वाहन चालक अनिल सोनकांबळे व एजाज शेख यांचा सहभाग होता.सदर कारवाईचा तपास पी ए मुळे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तुळजापूर हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे