ब्रेकिंगमहाराष्ट्र
जुनी पेन्शन मागणी संदर्भात तुळजापूर तहसील कर्मचाऱ्यांचे सामूहिक रजा व आंदोलन
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

जुनी पेन्शन मागणी संदर्भात तुळजापूर तहसील कर्मचाऱ्यांचे सामूहिक रजा व आंदोलन
आंदोलनास तहसीलदार अरविंद बोळंगे यांनीही पाठिंबा दर्शविला
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
जूनी पेन्शन मागणी संदर्भात तुळजापूर तहसील कार्यालयीन संबंधित कर्मचारी दि. १४ डिसेंबर रोजी सामुहिक रजा बेमुदत संपात सहभागी होत तहसील कार्यालय गाडी पार्किंग येथे ठिय्या आंदोलनात बसले आहेत.
यापूर्वीच तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे त्यांच्या काही मागण्या संदर्भात आंदोलन झाले होते. त्यानंतर मुख्यालयीन कर्मचारी, उपकोषागार विभागातील एक कर्मचारी, सर्व मंडळ अधिकारी, गावकामगार तलाठी, अशोक भातभागे, शिंदे ,वाहनचालक आदी असे एकूण ८३ कर्मचारी त्यामध्ये मंडळ अधिकारी अमर गांधले, बाळासाहेब पवार व इतरांचा समावेश आहे.