मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आवाहन
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आवाहन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीकरीता मराठा समाजाकडुन आंदोलनात्मक कार्यक्रम होत आहेत. या मुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या साठी योग्य ती खबरदारी म्हणून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
तसेच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीकरीता राज्य शासनास दि.२४ डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत दिलेली असुन त्यानंतर आरक्षण न मिळाल्यास संपुर्ण राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.
आगामी काळात मराठा आरक्षण अनुषंगाने होणारे विविध प्रकारची आंदोलने आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने पोलिस अधीक्षक, धाराशिव यांच्या अध्यक्षतेत तुळजापूर शहरातील व तालुक्यातील मराठा समाजाचे नेतृत्व करणारे नेते व पदाधिकारी यांची शांतता बैठक पोलिस ठाण्यात तुळजापूर कार्यालय येथे पार पडली.
सदर आयोजीत बैठीकत व्यासपीटावर धाराशिव पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख ,पोलिस निरीक्षक गजानन घाडगे,सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे,पोलीस उपनिरीक्षक कल्याण पवार उपस्थित होते.पदाधिकारी यांचे म्हणणे ऐकुन घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.पोलिस अधीक्षक यांनी मागील वर्षभरात झालेले सर्व आंदोलने शांततेत पार पाडली असुन आगामी काळात सर्व नागरीकांनी लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या शासनापूढे मांडाव्यात. इतर नागरीकांना त्रास होणार नाही तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे, तसचे गावखेड्यात व शहरी भागात एकोप्याचे वातावरण अबाधीत ठेवावे. सोशल मिडीयावर जुने मॅसेज, फोटो पसरवून शांतता भंग होणार नाही तसेच दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी. असे प्रकार होत असल्यास तात्काळ पोलीस प्रशासनास अवगत करावे.आयोजित करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबतची माहिती संबंधीत पोलीस ठाण्यात द्यावी. आंदोलनात गुंडप्रवृत्तीचे व उपद्रवी लोक सामिल होवून आंदोलानास गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, यांनी केले आहे.