न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

चोरीच्या मोटारसायकलसह आरोपीला अटक

Post - गणेश खबोले

चोरीच्या मोटारसायकलसह आरोपीला अट

 

उस्मानाबाद

ढोकी पोलीस ठाणे : कळंब रोड, ढोकी येथील जाकीर हबीब सय्यद यांची मोटारसायकल क्र. एम.एच. २५ एस १९९२ अंदाजे १०,००० र किमतीची दि. ०४.०२.२०२३ रोजी १६.०० वा. सु. ढोकी हिरो होन्डा स्पेलन्डर सय्यद यांच्या घरा समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होतो. यावरुन जाकोर सय्यद यांनी दि. १०.०२.२०२३ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम ३७९ अंतर्गत ढोकी पो.ठा. येथे गुन्हा क्र. ६८/२०२३ हा नोंदवला आहे.

सदर गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ढोकी पो.ठा. च्या सपोनि श्री. जगदीश राऊत, पोलीस अंमलदार- सातपुते, क्षिरसागर, खोकले, थाटकर यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास केला. यात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या सोडीआर/एसडीआर व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नायगाव, ता. केज येथील वैभव चितामणी महामुनी वय ३५ वर्ष यास दि. १२.०२.२०२३ रोजी ताब्यात घेउन त्यांचे कडे चौकशी केली + असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुल करुन त्याने चोरी केलेली मोटरसायकल क्र. एम.एच. २५ एस १९९२ अंदाजे १०,०००₹ किमतीची ही कुभेफळ ता. केज जि. बीड येथून जप्त केली आहे तसेच इतर दोन मोटर सायकल त्यातील एक स्पेलन्डर विदाऊट नंबरची जिची किंमत अंदाजे ३०,००० र होन्डा शाईन के एमएच २५ व्ही २४३४ किंमत अंदाजे ४०,००० र ही असा एकुण ८०,०००₹ किमतीच्या नमूद चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेऊन त्यास अटक केली असून गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे