स्नेहसंमेलनातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो-सिनेअभिनेता अशोक शिंदे

स्नेहसंमेलनातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो-सिनेअभिनेता अशोक शिंदे
नळदुर्ग /न्यूज सिक्सर
महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनातूनच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.त्यातूनच चांगले कलाकार निर्माण होऊ शकतात त्यासाठी महाविद्यालयीन मुलामुलींनी व्यासपीठावर जाऊन आपली कला सादर करण्याचे धाडस दाखवावे असे मत मराठी सिनेकलावंत अशोक शिंदे यांनी व्यक्त केले . नळदुर्ग येथील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बालाघाट शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा अणदूरचे सरपंच रामचंद् रदादा आलूरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून बालाघाट शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रकाशराव चौघूले, प्राचार्य डॉ.संजय कोरेकर, उपप्राचार्य डॉ.रामदास ढोकळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा चाँद कुरेशी, सांस्कृतिक प्रमुख डॉ सुभाष राठोड, कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील , डॉ दिपक जगदाळे , प्रा हंसराज जाधव,डॉ पी.एस.गायकवाड डॉ.सचिन देवद्वारे,डॉ .कपिल सोनटक्के ,प्रा.गजानन चिंचडवाड ,डॉ जयश्री घोडके ,प्रा.झरीना पठाण प्रा.संगीता मोरे उपस्थित होते.
यावेळी दोन दिवसांत झालेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थांचा, तसेच वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थाचा सिनेकलावंत अशोक शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ संजय कोरेकर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या खुमासदार शैलीत डॉ संतोष पवार यांनी केले तर आभार डॉ सुभाष राठोड यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ रामदास ढोकळे डॉ उध्दव भाले डॉ विजय सावंत प्रा प्रशांत अमृतराव डॉ अशोक कांबळे डॉ हाशमबेग मिर्झा डॉ समीर पाटील, डॉ रोहिणी महिंद्रकर डॉ निलेश शेरे प्रा हणमंत पाटील प्रा धनंजय चौधरी प्रा नेताजी बिराजदार प्रा बालाजी गायकवाड प्रा बाबा सूर्यवंशी प्रा युवराज पवार प्रा पिरजादे परवेज सुरेश गायकवाड, वैजीनाथ चिंचोले विनायक राठोड भागीनाथ बनसोड अतुल बनसोडे माणिक राठोड नितीन काळे बारीकशिंदे विजय सुरवसे सिद्धू सुतार हामेद काजी बाबा कांबळे सुनील कुंभार रमेश सर्जे धनंजय बागडे आदिनी परिश्रम घेतले .