न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी…
Post - गणेश खबोले

लोहारा / प्रतिनिधी
दिनांक 15 फेब्रुवारी रोजी लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कुलचे प्राचार्य श्री शहाजी जाधव, प्रमुख अतिथी म्हणून देवगिरी कॉलेजचे उपप्राचार्य श्री यशवंत चंदनशिवे,सहशिक्षक श्री प्रेमदास राठोड आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनात राठोड सर यांनी सांगितले की, त्यांचा जन्म 1769 साली आंध्र प्रदेश मधील गुत्तीबल्लारी याठिकाणी झाला व मृत्यू 1806 मध्ये झाला. त्यानंतर श्री चंदनशिवे सर यांनी संत श्री सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्र व कार्याची साविस्तर माहिती दिली, त्यांनी गोर समाजासाठी केलेले कार्य हे सर्वासाठी खूपच प्रेरणादायी आहे असे सांगितले. याप्रसंगी स्कूलच्या संचालिका सविता जाधव, मीरा माने,संतोषी घंटे, सरिता पवार, माधवी होगाडे, वैष्णवी कुंभार, सोमनाथ कुसळकर, व्यंकटेश पोतदार व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सविता जाधव यांनी तर आभारप्रदर्शन श्री शहाजी जाधव यांनी केले.