न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

एक लाख 91 हजार 460 रुपये पोलिस प्रशासनाने रिकव्हर करून महिला अरोपीस अटक केली

एक लाख 91 हजार 460 रुपये पोलिस प्रशासनाने रिकव्हर करून महिला अरोपीस अटक केली

एक लाख 91 हजार 460 रुपये पोलिस प्रशासनाने रिकव्हर करून

महिला अरोपीस अटक केली

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध श्री तुळजाभवानी मंदिरात गोमुख तीर्थ कल्लोळ जवळ एका भाविकाचे अज्ञात व्यक्तीने सोन्याचे मंगळसूत्र गंठण इतर सोन्याचे दागाने चोरी केले.मंदिरात एका महिलेच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघड झाली होती. हा प्रकार उघड होताच भाविकांना मोठा धक्का बसला होता. मात्र तुळजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोना गंठण जुबा फुले मनी इतर सोना एकूण किंमत एक लाख 91 हजार 460 रुपये केला आहे. चोरी गेले होते पोलिस प्रशासनाने हस्तगत करून महिला अरोपीस अटक केली
चंद्रकांत शंकर नाईक सोनार यांनी अंदाजे रक्कमएकूण किंमत एक लाख 91 हजार 460 रुपये केला आहे. केली आहे.
प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरिक्षक कल्याण पवार तसेच विटामलदार अतुल यादव वैभव देशमुख अमोल पवार महिलांमध्ये महिला पोलिस शिंदे साळुंखे पवार गाडी चालक पोलीस गणेश पतंगे यांनी कामगिरी केली आहे.

तुळजापूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ काही थांबायचं नाव घेत नाही. कधी घरफोडी तर कधी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणे, तर कधी बेधडक दरोडे असे प्रकार सध्या वाढताना पाहायला मिळत आहेत. आता तर गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरातून एका भाविक महिलेच्या  गळ्यातील चोरट्यांनी मंगळसूत्र ,गंठण, झुबे फुले इतर दागीने पळविले होते. हा मंदिर परिसर किती सुरक्षित आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. अनेक चोऱ्या मंदिर मध्ये होत आहेत सुरक्षा रक्षक यांनी सीसीटीव्ही पाहून तात्काळ दखल घ्यावी आणि भाविकांची चोरी होणारे थांबवावी पुजारी व शहरवासीयातून मागणी होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे