न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्र

वागदरीत दिवाळी सारखा साजरा केला वृक्ष लागवडीचा उपक्रम

वागदरीत दिवाळी सारखा साजरा केला वृक्ष लागवडीचा उपक्रम

नळदुर्ग/न्यूज सिक्सर
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून वागदरीच्या गावकऱ्यांनी वृक्ष लागवड व संगोपनाच्या उपक्रमाची सुरुवात दिवाळी सणासारखी साजरी करून केली.

सहा महिन्यापूर्वीच ग्रामपंचायत मध्ये नव्याने निवडून आलेल्या लोकनियुक्त सरपंच व सदस्यांनी वागदरी गाव सुजलाम-सुफलाम करण्यासाठी अनेक विकास कामांची सुरुवात केली आहे,तर काही कामांचे लोकार्पण ही झाले आहे.जिल्ह्यात पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच पर्यावरण,कृषी,पारधी बांधव जागृतीचे मोठे काम करत आहेत.जिल्ह्यात त्यांनी दहा लाख वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.या चळवळीत वागदरी ग्रामस्थ ही 5000 वृक्ष लावून सहभाग नोंदवत आहेत.यासाठी फळझाडे व वड, पिंपळ उंबर,चिंच,करंज,शिसव अशा देशी वृक्षांची लागवड होत आहे.यासाठी श्री.कुलकर्णी यांनी 1000 झाडे पाठवून दिले आहेत.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे श्री.उमाकांत मिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हलग्यांच्या कडकडाटात, फटाक्यांच्या आतिषबाजीत,वृक्षांना औक्षण करून,हार घालून,रांगोळी काढून प्रातिनिधिक स्वरूपात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

वृक्ष लागवडीचा हा उपक्रम सुरुवात करत असतानाच योगायोगाने
वरूणराजानेही जोरदार हजेरी लावली. याचवेळी पावसात ओले चिंब होऊन गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला व सर्व वृक्षांचे उत्तम संगोपन करण्याचाही संकल्प केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे