न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

सण, उत्सव सर्वांनी शांततेत व गुण्यागोविंद्याने साजरे करण्याचे आवाहन :- सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे

Post - गणेश खबोले

 

नळदुर्ग (सतीश राठोड ) :-

नळदुर्ग पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात आगामी काळात साजरा होणाऱ्या गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, ईद मिलाद, दिपावली, आदी सह सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावेत, या दरम्यान कुठल्याही जाती धर्मानमध्ये तेढ निर्माण होवू नये. सर्व सण उत्सव सर्व समाज घटकांनी एकत्रीत रित्या आंनदाने साजरे करावेत असे आवाहन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी केले आहे .
आगामी काळात साजरा होणाऱ्या सण उत्सव यानिमित्ताने नळदुर्ग शहरात जलद कृती बल (रॅपीडॅक्शन फोर्स) व नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पोलीस अंमलदारासह कर्मचाऱ्यांनी गावात पथसंचलन केले .
समाज विघातक/असामाजिक प्रवृत्तींमुळे समाजात धार्मीक असहिष्णुता पसरुन सार्वजनिक शांतता भंगाच्या दुर्देवी घटना देशभरात यापुर्वी अनेकदा घडल्या आहेत. येणाऱ्या आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव आणि नजीकच्या काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका या शांततेत भयमुक्त वातावरणात पार पाडल्या जाव्यात व या दरम्यान समाज कंटकांकडून सार्वजनिक शांततेचा भंग होवू नये, त्यांच्यावर जरब निर्माण व्हावी आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित राहवी, या उद्देशाने नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील किल्ला गेट चावडी चौक, भवानी चौक शास्त्री चौक मुख्य बाजारपेठ बस स्थानक माऊली नगर कुरेशी गल्ली
असा संपूर्ण गावातील या संवेदनशिल भागात नळदुर्ग पोलीस स्टेशन व जलद प्रतिसाद पथक सीआरपीएफ 99 बटालियन यांनी संयुक्त रुट मार्च केला व या दरम्यान व्यापारी ,जनतेशी संवाद साधण्यात आला.
धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखली, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख. जलद कृती (रॅपीडॅक्शन फोर्स) दलाचे डेप्युटी कमांडंट वीरेंद्र कुमार यादव, कंपनी कमाडंर कृष्ण कुमार चंद्रा, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे , पोलीस निरीक्षक सुरज देवकर , पोलीस उपनिरीक्षक रियाज पटेल पोस्टे स्टाफ यांचेसह केंद्रीय बलाचे 60 जवान व नळदुर्ग पोलीस दलाचे 03 अधिकारी व अंमलदार 25 असे सदर पथसंचलनात सहभागी झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे