नियोजन दूरदृष्टी व सातत्य असेल तर सहकारात यश मिळते – दत्ता कुलकर्णी
ज्ञानेश्र्वर गवळी तुळजापूर

नियोजन दूरदृष्टी व सातत्य असेल तर सहकारात यश मिळते – दत्ता कुलकर्णी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नियोजन दूरदृष्टी व सातत्य असेल तर सहकारात हमखास यश मिळते. गुणवत्ताधारक व दर्जेदार लोकांनी सहकार क्षेत्रात यावे. योग्य दिशेने विश्वास ठेवून काम केले तर सहकारात यश मिळते असे प्रतिपादन सिद्धिविनायक ग्रुपचे अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी यांनी केले.
भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित उस्मानाबादच्या३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते दिनांक 20 ऑगस्ट रोजी रविवारी येथील पुष्पक मंगल कार्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष विशाल घोगरे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एम.डी. देशमुख,मुख्य प्रवर्तक पी. एन. चव्हाण,मार्गदर्शक वसंतराव भोरे,निवडणूक निर्णय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुंडे,सदस्य हणमंत कोळपे, मुख्याध्यापक एस. एस. पाटील,पी. एन. पाटील, एन. व्ही. शिंदे, संस्थेचे माजी अध्यक्ष संजय मनोहर देशमुख, प्रा.रवी सुरवसे,सचिव अमरसिंह देशमुख,उपाध्यक्ष शशिकांत पडवळ व संचालक मंडळ होते.एम.डी. देशमुख म्हणाले की सहकार तात्विकतेच्या विचाराने चालवले तर ते दीर्घकाळ टिकते.चांगल्या लोकांनी दक्ष राहून सहकार क्षेत्रात प्रवेश करणे गरजेचे आहे.संस्थेचे सचिव अमरसिंह देशमुख अहवाल वाचन करताना म्हणाले की संस्थेने ८% लाभांश सभासदांच्या खात्यावर जमा केला आहे. कर्ज मर्यादा ३०लाख रुपये तर व्याजदर ११% टक्के करण्यात येत आहे. सभासदांच्या कुटुंब कल्याण निधीतून व विम्यातून मयत सभासदांचे कर्ज वीस लाख रुपये पर्यंत कर्ज माफ करून उर्वरित रक्कम मयत सभासदांच्या वारसदारांना देण्यात येईल.सभेचे प्रास्ताविक पतसंस्थेचे संचालक बालाजी तांबे यांनी तर सूत्रसंचालन संचालक विजयकुमार कुलकर्णी यांनी केले. प्रारंभी मान्यवरांनी भाई उद्धवराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन केले. मयत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. या सभेस पतसंस्थेचे संचालक अमोल सरवळे उत्तरेश्वर चव्हाण, विलास खरात, ललिता लोमटे, सिंधू कांबळे, तसेच मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत पडवळ यांनी आभार मानले.