मधुकरराव चव्हाण साहेबांनीच 2024 ची निवडणूक महाविकास आघाडीकडून लढवावी कार्यकर्त्यांचा निर्धार कार्यकर्त्यांनी कामाला लागावे– चव्हाण

मधुकरराव चव्हाण साहेबांनीच 2024 ची निवडणूक महाविकास आघाडीकडून लढवावी कार्यकर्त्यांचा निर्धार
कार्यकर्त्यांनी कामाला लागावे– चव्हाण
उस्मानाबाद /न्यूज सिक्सर
उस्मानाबाद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मनोगत व्यक्त करतांना धाराशिव तालुक्यातील 72 गावातील बहुसंख्य सरपंच, चेअरमन, उपसरपंच,ग्रा.प.सदस्य,बुथकमिटी अध्यक्ष पक्षाचे पदाधिकारी सर्वानुमते माजी मंत्री मा.मधुकरराव चव्हाण साहेबांनीच 2024 ची निवडणूक लढवावी असा निर्धार केला.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री मा.मधुकरराव चव्हाण,कार्याध्यक्ष खलील सय्यद,संघटक राजेंद्र शेरखाने, उपाध्यक्ष लक्ष्मण सरडे, तालुकाध्यक्ष रोहित भैय्या पडवळ,भागवत राव धस, प्रशांत पाटील, सरचिटणीस दौलतराव माने, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत,शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, काकासाहेब सोनटक्के,ढोकीचे सरपंच अमोल समुद्रे,काटीचे सरपंच सुजित हंगरकर,अमर माने,शरणाप्पा कबाडे, कालिदास पाटील,आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा.मधुकरराव चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सध्याची राजकीय परिस्थिती अस्थिर असली तरी मा.राहूलजी गांधी, मल्लिकार्जून खरगे, यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेस पक्ष जनतेसोबत राहून न्याय मिळवून देण्यास कटिबद्ध असल्याचे सुतोवाच केले.फुले,शाहू आंबेडकरांचे विचार आचरणात आणून देशाला पुढे नेण्यासाठी फक्त आणि फक्त काॅंग्रेस पक्षच पात्र असल्याचे सांगितले.मागिल पाच वर्षांतील तूळजापूर मतदारसंघातील विकासावर बोलताना केवळ फेसबुक व सोशल मीडिया व वर्तमानपत्रातूनच बातम्या ऐकतो, प्रत्यक्षात जनतेच्या व्यथा, महागाई, विकास कामांचा निधी, शेतकरी, शेतमजूर,युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कुठलाही कार्यक्रम या सरकारकडे नाही,बोलाचा भात आणि बोलाचीच कढी अशी अवस्था आहे.त्यामुळे यापुढच्या काळात राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी आपल्याशी संवाद साधत असल्याचे सांगितले.
यावेळी राजेंद्र शेरखाने, दौलतराव माने,भागवत धस, लक्ष्मण सरडे, अमोल समुद्रे सुजित हंगरकर यांनीही मार्गदर्शन केले.तर सरपंच मधुकर गंगणे, गोविंद ढोबळे,काझी,खोचरे गुरुजी,शैलेश पाटील,बापू खटके,काका सोनटक्के, तुकाराम कांबळे,लैलाबी शेख,रियाज पठाण यांनी मनोगत व्यक्त केले, तसेच प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रोहित भैय्या पडवळ यांनी केले.
कार्यक्रमासाठी सूधीर गव्हाणे, सुग्रीव कांबळे, रामेश्वर लोकरे, संजय पवार,अकबर शेख,राजेश सुतार, अशोक शिंदे, अमोल पाटील, बालाजी ढवळे, रणजित पाटील,बाबा देडे, सलमान शेख,राजेश शिंदे, गणेश सापते,राम काळे, बालाजी हुबाले, सूर्यकांत सौदागर, गणपती कांबळे, संतोष माने, अमोल मस्के आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.