बापल्योक हा मराठी चित्रपट २५ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार – अभिनेते शंतनु गंगणे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

बापल्योक हा मराठी चित्रपट २५ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार – अभिनेते शंतनु गंगणे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तीर्थक्षेत्र तुळजापूर श्री आई तुळजाभवानीच्या पुण्य पावन नगरीत
चित्रीकरण झालेला बापल्योक हा मराठी चित्रपट २५ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने प्रमुख कलाकारांनी तुळजापुरातील स्थानिक कलाकारांसोबत तूळजाभवानी मातेच दर्शन घेतलं आणि चित्रपटाचे पोस्टर जगदंबे चरणी वाहिलं.
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे हे या चित्रपटाचे सादरकर्ते असून मकरंद शशीमधु माने यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. शशांक शेंडे, विठ्ठल काळे ,नीता शेंडे, पायल जाधव यांच्या प्रमुख भूमिका असून तुळजापुरातील भगवंत शामराज , डॉक्टर शिवाजी जेटीथोर, अनिकेत क्षिरसागर , दिनेश क्षीरसागर, वीर गंगणे, स्वीटी डोंगरे , मधुसुदन गंगणे , आयुष जगताप , राघव जगताप, राजेश जगताप, सुनील रोचकरी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका मध्ये काम केल आहे.या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून अभिनेता शंतनु गंगणे यांनी काम पाहिल आहे.चित्रपटातील तुळजापूर तालुक्याचे सौंदर्य बघून इतर निर्माते, दिग्दर्शक सुद्धा तुळजापूर परिसरात चित्रीकरणासाठी येतील असा विश्वास शंतनु गंगणे यांनी व्यक्त केला.