
लोहारा-प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघा खुर्द येथे नविन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मान्यवरांनी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून केली. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे पुष्प देवून स्वागत करण्यात आले.यावेळी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे वितरण तसेच गावातील शिक्षणप्रेमी नागरीक महादेव तडोळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक विकास घोडके यांनी दानशूर व्यक्तींनी शाळेसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शाळेला आपल्या आधाराची गरज आहे.पालकांनी दररोज एक ते दोन तास विद्यार्थ्याचा अभ्यास घ्यावा. शिक्षणामुळे परीस्थिती सुधारून जीवनमान उंचावेल.मुलाच्या शिक्षणासाठी पुरेपूर लक्ष द्या. सकारात्मक कामासाठी शाळेकडे वारंवार या असे आवाहन उपस्थितांना केले.
यावेळी विद्यार्थ्यांचे तोंड गोड व्हावे यासाठी शिरा व खिचडी करण्यात आला होती.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकुमार गरगडे,उपाध्यक्ष अंगद भोंडवे,सदस्य शिवहरी दळवे,मारूती भोंडवे,मुख्याध्यापक विकास घोडके,सहशिक्षिका उषा बर्डे, ज्येष्ठ नागरिक मारूती भोंडवे, संदीपान शिंदे,बब्रुवान भोंडवे,शिवाजी बोंडगे,लक्ष्मण भोंडवे,महादेव तडोळे,बालाजी सोनटक्के,विनायक गरगडे,चॉंद मुजावर,राजेश भोंडवे,अजित मत्ते,भरत मत्ते,हमीद मुजावर,रईसा मुजावर यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज शाळेचा पहिलाच दिवस शाळेत आमच स्वागत झाल खुप छान वाटत आहे. मी खुप अभ्यास करणार आहे.
-स्वरा भोंडवे,विद्यार्थी पहिली
शाळेत अभ्यासा बरोबर खेळायला मिळते.आज पुस्तके मिळाली.मी शिकून डॉक्टर होणार आहे.
-विराज घोडके,विद्यार्थी पहिली