
लोहारा-प्रतिनिधी
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर राज्य शिक्षण मंडळाचे २०२४-२५ शैक्षणिक वर्ष दि.१५ जुन पासुन सुरू झाले.
राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्याने पाठीवर दप्तर आणि हातात पाण्याची बॉटल घेऊन विद्यार्थीनी शाळेत प्रवेश केला.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पहिल्याच दिवशी शाळेचा परिसर गजबजून गेल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्या दिवशी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा येथे शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना शाळेत पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्यापूर्वीच तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक आणि इतर कर्मचारी ११ जूनपासून हजर झाले होते. गेल्या चार दिवसांपासून मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मुलांच्या प्रवेशाची तयारी केली होती यामध्ये वर्गखोल्या,शाळेचे आवार आदींची स्वच्छता करण्यात आली होती.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना फुल,चॉकलेट व शैक्षणिक साहित्य देण्यात आले.आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मधुकर रोडगे तर पालक प्रतिनिधी म्हणून सुमित झिंगाडे,अझरोद्दीन खुटेपड,राणी कांबळे यांच्यासह पालक उपस्थित होते.
आपल्या शाळेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर आहे. दर्जेदार शिक्षण, कला कौशल्य खेळ, याला येथे मोठ्या संख्येने वाव दिला जातो.तरी पालकांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठवुन आपल्या पाल्याचा पाया मजबूत करून घ्यावा असे मत मुख्याध्यापक मधुकर रोडगे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
यावेळी मोहन शेवाळे,सुरेश अबुरे,मच्छिद्र भुजबळ,दत्तात्रय फावडे,अनंत सुतार,रमेश बनसोडे, बालाजी यादव,गुरुनाथ पांचाळ,प्रताप साळुंखे,सुरेश साळुंखे, संतोष माळवदकर,बोरसुने,दयानंद क्षीरसागर,अतुल भड,सचिन शिंदे,प्रमोद सरवदे,महानंदा चव्हाण,वर्षा चौधरी,अर्चना साखरे,ज्योती पाटील,नेहा भंडारे,सोनम कांबळे,वाय ए तांबोळी आदीसह शिक्षक व पालक विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पांढरे यांनी केले तर प्रस्ताविक बालाजी मक्तेदार यांनी केले
-
oppo_32