नामदार रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्ताने नळदुर्ग येथे कार्यक्रम संपन्न

नामदार रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्ताने नळदुर्ग येथे कार्यक्रम संपन्न
वागदरी /न्यूज सिक्सर
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग ता.तुळजापूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया नळदुर्ग शहरशाखा व परिसरातील कार्यकर्त्यांच्या वतीने नामदर रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथे संविधान चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधानचौक नामफलकास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. याप्रसंग कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे आदींची आभिष्ठचिंतनपर भाषणे झाली. याप्रसंगी रिपाइं अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशिदभाई कुरेशी, रिपाइं नळदुर्ग शहराध्यक्ष दत्ता बनसोडे, कार्याध्यक्ष महादेव कांबळे,चंद्रकांत दुपारगुडे,शंकर माटे,युवा नेते राजू लोंढे, केशव सगट,जेष्ठ कार्यकर्ते राजकुमार बनसोडे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.