सेंद्रिय शेती पध्दती ही किफायतशीर ठरणार-पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत सेंद्रिय शेती कार्यशाळा संपन्न

सेंद्रिय शेती पध्दती ही किफायतशीर ठरणार-पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत सेंद्रिय शेती कार्यशाळा संपन्न
तुळजापूर /न्यूज सिक्सर
टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर यांच्या वतीने सेंद्रिय शेतीला चालना देण्याच्या उद्धेशाने एक दिवशीय सेंद्रिय शेती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उदघाटक म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री महेश तीर्थकर, टाटा संस्थेचे उप संचालक प्रो. रमेश जारे श्री आजीनाथ काशीद, पोलीस निरीक्षक तुळजापूर, टाटाचे सामाजिक कार्यकर्ते श्री. गणेश चादरे श्री आनंद भालेराव श्री शंकर ठाकरे श्री राम राठोड डॉ नीलम यादवा टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर सौ. वैशाली घुगे श्री मनोहर दावणे श्री रेवनसिद्ध लामतुरे आदी मान्यवर उपस्थित होते. तर समारोप कार्यक्रमासाठी श्री. अतुल कुलकर्णी जिल्हा पोलीस अधिक्षक उस्मानाबाद श्री एम रमेश डी वाय एस पी कळंब तसेच सेंद्रिय शेती करणारे तुळजापूर, लोहारा, कळंब, उस्मानाबाद, भूम, उमरगा या तालुक्यातील 150 शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत सहभाग झाले होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री गणेश चादरे यांनी केले.
या प्रसंगी महेश तीर्थकर म्हणाले की, वाढता शेतीतील खर्च व जोखीम याचा विचार करता भविष्यात सेंद्रिय शेती ही महत्वपूर्ण ठरणार आहे. त्या दृष्टिने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने आयोजित केलेली कार्यशाळा जिल्ह्ल्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी प्रो. रमेश जारे म्हणाले की, टाटा सामाजिक संस्था ही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 1986 पासुन समाजकार्य व समाजशास्त्र शिक्षण देण्याबरोबरच क्षेत्रकार्य व संशोधन कार्य प्रकल्पाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला चालना देण्याच्या अनुषंगाने कार्य करत आहे. येणाऱ्या काळामध्ये टाटा संस्था, कृषि विभाग, पोलीस प्रशासन, कोहिजन संस्था, स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था, उमेद व प्रयोगशील शेतकरी यांच्या सहभागातून पथदर्शी प्रकल्प म्हणून कळंब व तुळजापूर तालुक्यातील 10 गावांमध्ये सेंद्रिय शेतीचे प्रयोग करणार असल्याचे सांगितले.
पोलीस निरीक्षक आजीनाथ काशीद यांनी त्यांच्या शेतामध्ये राबविण्यात आलेले सेंद्रिय शेतीचे प्रयोग व आंबा लागवडीचे अनुभव सांगितले.
शेतीला पुरक व पोषक असा व्यवसाय म्हणून गांडुळखत निर्मिती प्रकल्प शेतकऱ्यांनी राबविणे आवश्यक असल्याबाबत वैशाली घुगे यांनी सांगितले.
उमेदच्या कृषि सखी कोळगेताई, लक्ष्मी म्हेत्रे, यांनी गांडूळखत, दशपर्नि अर्क, जीवामृत याच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सेंद्रिय शेतीतील विविध प्रयोगांची माहिती दिली.
डॉ. नीलम यादवा म्हणाल्या की, महिलांचा शेतीतील वाढता सहभाग लक्षात घेता त्यांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
समारोपीय मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधिक्षक श्री अतुल कुलकर्णी म्हणाले की, जिल्ह्यातील वाढते शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हा गंभीर विषय आहे. भविष्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी सेंद्रिय शेती पध्दती ही किफायतशीर ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी असे आव्हान केले.
कार्यशाळेचे आभार प्रदर्शन आनंद भालेराव यांनी मानले.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्री गणेश चादरे श्री शंकर ठाकरे, आनंद भालेराव, दत्ता सोनवणे विनोद कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले.