महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या रितेश देशमुख-जिनिलीया श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणार रितेश देशमुख व जिनिलीया ‘जवाहर सिनेमागृह’ला भेट देणार

महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या रितेश देशमुख-जिनिलीया श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणार
रितेश देशमुख व जिनिलीया ‘जवाहर सिनेमागृह’ला भेट देणार
तुळजापूर /ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या रितेश देशमुख-जिनिलीयाशी आज श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी यणार.कलाविश्वातील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख ‘वेड’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्य पावण नगरीत येत आहेत.जिनिलीयांचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून रितेशही दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत चित्रपटसृष्टीतील त्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. ‘वेड’ निमित्ताने रितेश-जिनिलीयाने जवाहर सिनेमाग्रह तुळजापूर येथे भेट देणार आहेत
रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपट आज दि.३० डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रितेश व जिनिलीया मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटातील गाण्यांनी तर प्रेक्षकांना ‘वेड’ लावलं आहे. ‘वेड’ चित्रपट जवाहार सिनेमाग्रह येथे प्रदर्शित होणार आहे.