
लोहारा प्रतिनिधी
पवित्र रमजान सनानिमित्त लोहारा शहरातील बहिण भावाने रोजा उपवास पकडला आहे. एका नऊ वर्षाच्या चिमुकलीने तर चौदा वर्षाच्या भावाने रोजा पूर्ण केला आहे.
मुस्लिम समाजाचे पवित्र रमजान सण सुरू झाले असून या पवित्र रमजान निमित्त मुस्लिम समाज बांधव रोजा उपवास धरतात.
ऐन उन्हाळ्यात रमजान निमित्त उपवास रोजे सुरु झाले असून लोहारा शहरातील जैनब खालिद पटेल या नऊ वर्षाच्या चिमुकलीने पवित्र रमजान निमित्त उपवास रोजा ठेवले असून झीशान खालिद पटेल या चौदा वर्षाच्या बालकाने रोजा उपवास पूर्ण केला आहे.
एका दिवसाचे कटाक्ष उपवास बहीण भावाने पूर्ण केले असल्याने पालकासह शहरातून कौतुक केले जात आहे.