कार्यकुशल , उत्तम संघटक , जन्मभूमीच्या मातीशी नाळ जुळलेले खंबीर नेतृत्व म्हणजे मुकुंद दादा डोंगरे

कार्यकुशल , उत्तम संघटक , जन्मभूमीच्या मातीशी नाळ जुळलेले खंबीर नेतृत्व म्हणजे मुकुंद दादा डोंगरे
———————————————
उपेक्षित , वंचित , गोरगरीब , शेतकरी यांच्या प्रश्नांची अविरतपणे सोडवणूक करणारे नेतृत्व म्हणजे मुकुंद दादा डोंगरे होय कुशल संघटक , कठोर मार्गदर्शक , तत्वनिष्ठ व परखड वक्ते , चळवळीतील नेते मुकुंद दादा डोंगरे यांचा जन्म 26 मे 1962 रोजी तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे झाला
आजवर अनेक नेतृत्व पाहिले परंतु रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करणारे नेतृत्व आजवर तुळजापूर तालुक्यात दादांच्या व्यतिरिक्त पाहिले नाही मंगरूळ येथील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सर्वतोपरी मोलाचे सहकार्य त्यांचे आजपर्यंत लाभले आहे त्यांच्या सततच्या सहवासातून कुशल संघटक , उत्तम प्रशासक , खंबीर व आश्वासक नेतृत्व व दिलेला शब्द खरा ठरवणारे शब्दप्रभू म्हणून त्यांची खाती आहे तालुक्यातील बहुतांश गावातील युवा व जेष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना तसेच तळागाळातील जनतेला नावाशी ओळखणारे व त्यांना योग्य मार्गदर्शन करून प्रसंगी कठोर बोलणारे चळवळीतील नेते म्हणजे मुकुंद दादा डोंगरे
घरातील सामाजिक पार्श्वभूमीच्या जोरावर तरुण वयातच त्यांनी सर्वप्रथम जिल्हा परिषद सदस्य होऊन तालुक्यात नाव नावलौकिक मिळवला राजकीय क्षेत्रातील जबरदस्त पकड व चुणूक पुढील काळात त्यांनी जिल्हा परिषदेचे सभापतीपद , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद , मजूर फेडरेशनचे संचालकपद , सुतमिलचे संचालकपद व तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालकपद भूषवून आपले स्वतःचे व आपल्या जन्मभूमीचे नावलौकिक तालुक्यासह जिल्ह्यात केले अतिशय संघर्षवादी राजकीय वाटचाल त्यांनी त्यांच्या आयुष्यात करून अनेक राजकीय व कौटुंबिक स्थित्यंतराना धीरोदात्तपणे तोंड दिले आहे
वेळोवेळी शेतकऱ्यांना विविध प्रकारचे शेतीविषयक प्रयोग करून त्यांनी शेती करण्यास प्रोत्साहित केले
कृषी , सहकार , शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रात आमूलाग्र योगदान देऊन मंगरूळ व परिसराचा विकास साधला वयाचीसाठी ओलांडल्यानंतरही दादांची गावकरी व जनतेसाठी धडपड बघितली की एखाद्या तपस्वी योगीची आठवण येते राजकारण व समाजकारणातील तरुणांसाठी दादा हे आदर्शवत आहेत दादांच्या कल्पक नेतृत्वामुळेच मंगरूळ गावाची सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी तालुक्यासह जिल्ह्यात अधोरेखित झाली आज दादांचा वाढदिवस आदरणीय दादांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा तुम जियो हजारो साल , साल के दिन हो पचास हजार साल
——————————————–
**शब्दांकन चांदसाहेब शेख ( पत्रकार )*
———————————————-