श्री तुळजाभवानी मंदीर येथील पुजारी वर्गासाठी सिंहासन पुजा राखीव ठेवावे पुजारी वर्गातुन मागणी
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

श्री तुळजाभवानी मंदीर येथील पुजारी वर्गासाठी सिंहासन पुजा राखीव ठेवावे पुजारी वर्गातुन मागणी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तिर्थ क्षेत्र तुळजापूर श्री तुळजाभवानी मंदीर येथील पुजारी वर्गासाठी सिंहासन पुजा राखीव ठेवण्या बाबत शहरातील पुजारी बांधवांनी तुळजापूर तालुक्याचे आमदार तथा मंदीर संस्थानचे विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील यांना निवेदन देण्यात आहे. सदरील निवेदना मध्ये तुळजापूर शहरातील पुजारी बांधवांच्या परीवारा मध्ये विवाह,शुभ कार्य असल्सास पुर्वपरंपरेनुसार देविला सिंहासन पुजा ,साडीचोळी पुजा करण्याची परंपरा आहे परंतु मंदीर संस्थान यांनी सिंहासन पुजा आँनलाईन केल्या मुळे सिंहासन पोर्टल वरती बुकींग करण्यास अडचण होत होती त्यामुळे पुजारी वर्गासाठी राखीव सिंहासन पुजा ठेवण्या बाबत विश्वस्त बैठकीत पुजारी बांधवाच्या सिंहासन पुजे बाबत निर्णय घेण्यात यावा बाबत सबंध पुजारी बांधवाच्या वतीने आमदार निवेदन देण्यात आले. निवेदना वरती नगराध्यक्ष तथा विश्वस्त सचिन रोचकरी,युवा नेते विनोद गंगणे,लखन पेंन्दे,शहाजी भांजी,रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले,आमोल जाधव,निलेश टोले,गोपाळ पवार,पवन सुर्यवंशी,भैया शिंदे आदी पुजारी बांधवाच्या स्वाक्षरी आहेत.