तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती पदासाठी आज निवडणूक
ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती पदासाठी आज निवडणूक
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक बुधवार दि.२४ मे रोजी होणार आहे. त्यामुळे सभापती, उपसभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? याकडेच तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.
तुळजापूर बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उमेश बोफले
यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.२४ मे रोजी सकाळी ११.०० वा. विशेष सभा बोलवण्यात आली तरी सर्व संचालकानी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
सभापती व उपसभापती निवडीसाठी बुधवार स. ११.३० ते १२ या वेळेत नामनिर्देशन अर्ज वाटप व स्विकृती, दु. १२ : ते १२.१५ या वेळे तनामनिर्देशन पत्राची छाननी, दु.१२.३० वा. वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिध होणार आहे. दु. १२ : ३० ते १:०० पर्यंत नामनिर्देशन पत्र माघार घेता येणार दु. १: ०० वा.अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्दीकरण, करणार दु. १२.३० ते ०२.०० या वेळेत आवश्यक असल्यास मतदान प्रक्रिया होणार. २ : ०० वाजता पुढे मतमोजणी होणार लगेच निकाल जाहीर होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उमेश बोफले यांनी दिली आहे.