येणेगूर येथे सीसीटीव्ही तिसरा डोळ्याची करडी नजर राहणार

येणेगूर येथे सीसीटीव्ही तिसरा डोळ्याची करडी नजर राहणार
येणेगूर /न्यूज सिक्सर
चोऱ्याचे वाढते प्रमाण, अनुचित प्रकार घडू नये यावर अंकुश ठेवण्यासाठी उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे ग्रामपांचायती मार्फत तिसरा डोळा म्हणजेच सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आवश्यकतेनुसार बसवीले जात आहेत.
मालमत्ता व व्यक्तिगत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत सी.सी.टी.व्ही.सारख्या सुरक्षाप्रणालीचा वापर करण्यासाठी नूतन सरपंच व उपसरपंचानी प्रामाणिक प्रयत्न केले. सी.सी.टी.व्ही. सुरक्षाप्रणालीची उपयुक्तता व फायदा याचे महत्त्व ओळखुन या सुरक्षाप्रणाली सुरु कारण्याची तयारी चालू केली आहे .त्यामुळे लवकरच येणेगूरवर तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार असुन येथे सोमवारी मोठ्या प्रमाणात जानावरांचा, शेळी मेंढी व भाजीपाल्याचा आठवडी बाजार भरतो त्यामुळे सोमवारी येथे परिसरातील नागरिकांची मोठी वर्दळ असते याचा फायदा घेत पाकीटमारी, मोबाईल चोऱ्या होत असतात याला काही प्रमाणात आळा बसेल पण याचा ग्रामस्थांना कितपत फायदा होईल हे येणारा काळच ठरवीणार आहे.
देखभाल करण्याची, चित्रीकरणावर सतत लक्ष ठेवण्याची व चित्रीकरण जतन करून ठेवण्यासाठी येणाऱ्या खर्चाची आवश्यक ती आर्थिक तरतूद करणेही गरजेचे आहे नाहीतर सरपंच सौ सुनंदा माळी यांच्या काळात मोठा गाजावाजा करीत गावात तीन ठीकणी लाखो रुपये खर्चून आरो प्लॅन्ट बसवण्यात आले होते नागरिकांना शुद्ध पाणी न मिळाल्याने शासणाचे लाखो रुपये पाण्यात गेले तसे याही उपक्रमाचे होऊ नये असे जाणाकार नागरिकातून बोलले जात आहे.
*सर्व प्रकारच्या अप्रिय घटना, अनुचित प्रकार व चोऱ्या टाळण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी गावात ठीकठीकाणी तिसरा डोळा म्हणजेच सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आवश्यकतेनुसार बसवीले जात �