पोलिस निरिक्षक अजिनाथ काशीद यांची मानुसकी;महिला भाविकास केली अर्थिक मदत
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

पोलिस निरिक्षक अजिनाथ काशीद यांची मानुसकी;महिला भाविकास केली अर्थिक मदत
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविक यांचे मंदिरातून अज्ञात चोरट्याने पर्स चोरी करून केली गायब ही घटना दि.११ में रोजी सायंकाळी घडली महिला भाविक मेधा नाईक यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन पोलीस निरीक्षक यांच्याशी सर्व हकीकत सांगितल्यानंतर पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांनी त्या महिला भाविक यांना आर्थिक मदत केली.
पोलिस निरिक्षक अजिनाथ काशीद म्हणाले, ‘या विषयाकडे तक्रार म्हणून पाहण्यापेक्षा मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिले. श्रीमती मेधा नाईक यांची अडचण लक्षात आल्यानंतर पैसे देऊन सहकार्य केले. त्यांना दिलासा मिळणे अधिक गरजेचे होते.’ नाईक म्हणाल्या अडचणीच्या काळात पोलिसांनी मला केलेली मदत पाहून पोलिस अधिकारी व कर्मचारी माझ्यासाठी देवदूतच आहेत. माझ्याकडे अक्कलकोट मधून बॅग घेवून मुंबई – डोंबिवली कडेजान्या साठी पैसे नसल्याने जाऊ शकत नव्हतो; पण पोलिसांनी मदत केल्याने मला दिलासा मिळाला आहे.
पोलीस प्रशासनाने मंदिरातील सीसीटीव्ही चेक केल्यानंतर १४ ते १५ वर्षाची मुलीने पर्स चोरून घेऊन जाताना दिसत होती मात्र सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट दिसत नसल्याने काही कारवाई करण्यात आली नाही. मागील काही दिवसा पुर्वी बाहेरगावून श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या फॅमिली मधून वय वृद्ध व्यक्ती चुकामुक झाल्यानंतर पोलीस प्रशासन त्यांचे नातेवाईक जोपर्यंत त्यांना घेवून जाण्यासाठी येत नाहीत तोपर्यंत त्या वयवृद्ध व्यक्तीचे जेवण खाणे राहण्याची व्यवस्था बऱ्याच महिन्यापासून तुळजापूर पोलिस प्रशासन करत आहे हे आज स्पष्ट झाले.