मुख्यमंत्री विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी बोललेला नवस फेडण्यात आला
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

मुख्यमंत्री विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी बोललेला नवस फेडण्यात आला
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
मुख्यमंत्री विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले त्यावेळी बोलताना म्हणाले सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेयांच्या बाजूने निकाल लागावा यासाठी श्री तुळजा भवानी मातेस साडीचोळीची पुजा करण्याचे साकडे घातलेले होते त्याची पुर्तता करण्यासाठी गुरुवारी दि.११ मे रोजी सायंकाळी साधारण ८ वाजता मंदिरात आल्यावरती त्यांचे पौरोहित्य सुहास कदम यांनी केले पुजा करून नवस फेडला त्यानंतर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष, गुरुनाथ बडूरे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते अमरराजे कदम , तुळजापूर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी यांनी शाल श्रीफळ देवून सत्कार केला यावेळी माजी नगरसेवक अमर हंगरगेकर, दिनेश बागल,सचिन रसाळ आदी उपस्थित होते,यावेळी बडुरे यांनी गोरगरीब रुग्णांना योग्य मार्गदर्शन व वैद्यकीय मदत मिळण्यासाठी तालुकास्तरीय समन्वयक नेमण्याची मागणी चिवटे यांच्या कडे केली त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व तातडीने नेमनुक करू म्हणाले.