न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत तुळजापूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत तुळजापूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधीच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी   आज दि.11 मे रोजी तुळजापूर तहसील  कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले  व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आज राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून खालील मागण्यां करण्यात येत आहेत. पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा. , पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी.
, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा. ,  पत्रकारांच्या घरांसाठी  विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. ,  कोरोनात जीव गमावलेल्या  पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे.
,  शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात.
या मागण्यांसाठी  तहसील  कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले व तहसीलदार यांना आपण आमच्या या मागण्या आपल्यामार्फत शासनाच्या स्तरावर पाठवाव्यात अशी विनंती करण्यात आली यावेळी लोकमत प्रतिनिधी अजित चंदनशिवे , तरुण भारत प्रतिनिधी दिनेश सलगरे , एन tv प्रतिनिधी अय्युब शेख , एकमत प्रतिनिधी ज्ञानेश्वर गवळी , जनमत प्रतिनिधी चांदसाहेब शेख , ज्ञानेश्वर वाघमारे , सचिन ताकमोघे , अमीर शेख , बालाजी गायकवाड , प्रतीक भोसले , यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे