देशातील पहिल्या सेंद्रीय उत्पादक शेतकरी पासपोर्ट काढण्याच्या अभियानाची तुळजापूर तालुक्यातुन सुरुवात
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

देशातील पहिल्या सेंद्रीय उत्पादक शेतकरी पासपोर्ट काढण्याच्या अभियानाची तुळजापूर तालुक्यातुन सुरुवात
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
डॉ.अतुल कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधिक्षक, उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर व ग्रामपंचायत धारूर यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेतीला चालना देण्याच्या उद्धेशाने जिल्हास्तरीय सेंद्रियशेती नोंदणी अभियान व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याळेचे उदघाटन एस पी अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी, टाटा संस्थेचे प्रभारी उप संचालक डॉ. बाबासाहेब काझी, रविंद्र माने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,
प्रांजल शिंदे प्रकल्प संचालिका, डीआरडीए आणि उमेद अभियान, उस्मानाबाद
आजीनाथ काशीद, पोलीस निरीक्षक तुळजापूर, मेळावा समन्वयक गणेश चादरे, बालाजी पवार, सरपंच, धारूर, डॉ.विजय जाधव, कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर, मिलिंद बिडबाग तालुका कृषि अधिकारी, तुळजापूर, शोभा कुलकर्णी, माविम,नसीम शेख, स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था, धनाजी धोतरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळावा समन्वयक गणेश चादरे यांनी प्रास्ताविकामध्ये जिल्हास्तरीय सेंद्रीयशेती कार्याचापरिचय दिला.या प्रसंगी, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी बोलताना म्हणाले की, जिल्ह्यातील वाढते शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हा गंभीर विषय आहे. भविष्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी सेंद्रियशेती पध्दती ही किफायतशीर ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रियशेती त्याच बरोबर त्याचे प्रमाणीकरण ही करावे यासाठी आम्ही देशातील पहिल्या सेंद्रीय उत्पादक शेतकरी पासपोर्ट काढण्याच्या अभियानाची उस्मानाबाद जिल्ह्यातून सुरुवात करत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी, डॉ.बाबासाहेब काझी यांनी टीसने कृषि व सामाजिक क्षेत्रात समाजकार्य व समाजशास्त्र शिक्षण देण्याबरोबरच क्षेत्रकार्य व संशोधन कार्य प्रकल्पाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला चालना देण्याच्या अनुषंगाने कार्य करत असल्याचे सांगितले.
या प्रसंगी, रविंद्र माने यांनी
शासकीय सेंद्रियशेती योजना बाबत माहिती दिली. वाढता शेतीतील खर्च व जोखीम याचा विचार करता भविष्यात सेंद्रियशेती ही महत्वपूर्ण ठरणार आहे. त्या दृष्टिने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने आयोजित केलेला मेळावा जिल्ह्ल्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार असल्याचे माने यांनी सांगितले.
अभिलाष गोरे, प्रमाणीकरण तज्ञ,नाशिक यांनी सेंद्रीयशेती प्रमाणीकरण प्रक्रिया व पासपोर्ट बाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी, प्रांजल शिंदे यांनी सेंद्रीयशेती विकासात उमेद अभियानाचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले व महिलांचा शेतीतील वाढता सहभाग लक्षात घेता त्यांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. उमेद अभियानातील गटांनी प्रमाणीकरण प्रक्रियेत मोठ्या संख्येनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
नसीम शेख, स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या सेंद्रीयशेती उपक्रमाची माहिती दिली.
अजिनाथ काशीद, पोलीस निरीक्षक, तुळजापूर यांनी सेंद्रीय मालाला उपलब्ध करुन देण्यात आलेल्या मार्केट बाबतची माहिती दिली व मेळाव्याचे आभार प्रदर्शन केले.
या प्रसंगी, शुभम कदम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी तुळजापूर यांच्या वतीने मोरडा येथील गारपीटमधील नुकसानग्रस्त दहा शेतकऱ्यांना आर्थिक साह्य करण्यात आले. सूत्रसंचालन आनंद भालेराव व मनोहर दावणे यांनी केले.या मेळाव्यामध्ये 300 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अजिनाथ काशीद, पोलीस निरीक्षक, तुळजापूर, गणेश चादरे, आनंद भालेराव, श्रीराम कदम, जयसिंग पाटील, हरी पवार, वैभव क्षीरसागर, बालाजी गुरव, सज्जन पाटील, काका पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.