सत्यशील सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शालेय साहित्याचे वाटप

सत्यशील सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शालेय साहित्याचे वाटप
वागदरी/न्यूज सिक्सर
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने सत्यशील सामाजिक संस्था पुणे (वागदरी) च्या वतीने वागदरी ता.तुळजापूर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
प्रारंभी ग्रा.प.सदस्या गुनाबाई श्रीरंग बनसोडे, सत्यशील सामाजिक संस्थेचे अध्यक्ष वामन धाडवे, संस्थेचे सल्लागार परमेश्वर वाघमारे, विजय वाघमारे,जयंती उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष वामन धाडवे म्हणाले की,विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला अत्यंत महत्त्वा दिले असून संबंध मानवजातीला आपल्या उत्कर्षाकरीता शिका!संघटीत व्हा! संघर्ष करा ! असा मूलमंत्र दिला आहे. तेंव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने हा छोटेखानी उपक्रम राबविण्यात येत आहे.
याप्रसंगी रिपाइं (आठवले)चे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड,नंदु बिराजदार,युवा कार्यकर्ते सुंदर बनसोडे,जिजाबाई वाघमारे सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.