१८ पैकी भाजपा १४ जागा जिंकुन तुळजापूर बाजार समितीवर सत्ता राखली कायम

१८ पैकी भाजपा १४ जागा जिंकुन तुळजापूर बाजार समितीवर सत्ता राखली कायम
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंत्यत चुरशीचा झालेल्या निवडणूकीत १८पैकी भाजपा १४ जागा जिंकुन बाजार समितीवर आपली सत्ता कायम राखली तर महाविकास आघाडी ला चार जागा मिळाल्या
यात सोसायटी चा ११व्यापारी २ हमाल तोलर १जागा भाजपा ने जिंकली तर महाविकासआघाडी ने ग्रामपंचायत च्या चार जागेवर विजय मिळवला
या निवडणुकीत भाजपा ने दिग्गज उमेदवार उभे केले होते ते विजयी झाले.
शनिवार दि२९रोजी सकाळी श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्पोर्ट हाँल मध्ये सकाळी नऊ वाजता मतमोजणीस आरंभ झाला प्रथमता व्यापारी दोन व हमाल तोलार १जागीची निवडणूक होवुन त्यात भाजपा उमेदवार विजयी झाले नंतर ग्रामपंचायत गटाची मतमोजणी होवुन यात महाविकासआघाडी चे चार उमेदवार विजयी झाली नंतर सोसायटी गटाची मतमोजणी होवुन यात अकरा पैकी अकरा जागेवर भाजपा पँनल ने विजयी संपादन केला .
भाजपा- तुळजाभवानी शेतकरी विकास पँनल
(शिवसेना शिंदे गट पाठींबा ).
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
सोसायटी सर्वसाधारण मतदार संघ –
विजय विलासराव गंगणे,
सचिन प्रकाशराव पाटील,
संतोष रामदास बोबडे,
दीपक महादेवप्पा आलुरे,
कोरे सिद्धेश्वर बाजीराव, प्रशांत उत्तमराव लोमटे, सुहास शामराव गायकवाड.
सोसायटी इतर मागास प्रवर्ग
विजय सुधाकर शिंगाडे
सोसायटी भटक्या विमुक्त
जाती/जमाती
आशिष गणेश सोनटक्के,
सोसायटी महिला राखीव
जाधव सोनल महादेव,
पवार ताराबाई राम.
व्यापारी मतदार संघ –
बालाजी माणिकराव रोचकरी,
संतोष कल्याणराव कदम
हमाल / तोलार मतदारसंघ
दत्तात्रय विठ्ठल वाघमारे
हे विजयी झाले तर
महाविकासआघाडी विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
ग्रामपंचायत सर्वसाधारण. पाटील अशोक पुंडलिक,
. भोसले संजय चनबस
ग्राप अनु जाती
. ढवळे रामचंद्र दौलतराव
ग्राप आर्थिक दुर्बल
. जाधव सुनील चंद्रहार
हे विजयी झाले .
भाजपा व महाविकासआघाडी च्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी कुंकु गुलाल उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.