
लोहारा-प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी येथील शिक्षिका निर्मले सुनंदा मधुकर यांना जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे.
मातृसेवा फाउंडेशन ठाणे,सनेज आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.निर्मले सुनंदा यांनी दररोज इंग्रजीचे तीन शब्द हा उपक्रमाचा प्रस्ताव सादर केला होता.त्यांच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी दररोज तीन शब्द पाठांतर करणे व त्याचा वापर बोलीभाषित करणे असा होता.त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्द पाठांतराची आवड पण लागणार आहे व विद्यार्थ्यांना आत्मविश्वास पण येणार आहे. त्यांच्या या प्रस्तावास पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे लोहारा तालुक्यातील शिक्षकांकडून अभिनंदन केले जात आहे.