
लोहारा-प्रतिनिधी
गेल्या कित्येक महिन्यापासून लोहारा शहरात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालवताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती ते शिवाजी महाराज चौका पर्यंत रस्त्यावर खड्डे पडलेले आहे. त्या दुरुस्तीची प्रतीक्षा नागरिक गेल्या कित्येक महिन्यापासून करीत होते पण अचानक आज दि.७ मार्च रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लोहारा येथे मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त संबंधित प्रशासनाने मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचा खटाटोप केलेला दिसून आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून अत्यंत संथगतीने हे काम सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेवर कुठलाच फरक पडत नसल्याने सर्वांनीच हात टेकले आहेत.