वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार शिवाजी कांबळे यांचा सत्कार

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार शिवाजी कांबळे यांचा सत्कार
अणदूर /न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक 12 जागा बिनविरोध निघाल्या अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी निवडणूक लागली ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची व चर्चेची झाले या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय गाव पुढाऱ्यांच्या वतीने शिवाजी रतन कांबळे वंचित बहुजन आघाडीचे आर एस गायकवाड या दोघांमध्ये निवडणूक जाहीर झाली निवडणुकीमध्ये अत्यंत सौंदर्याचे वातावरण होते पण दोन दिवसात अत्यंत चुरस निर्माण झाली सर्व गाव पुढारी एकत्र येऊन सर्वपक्षीय उमेदवार शिवाजी कांबळे यांच्या पाठीमागे ताकद लावली वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड यांनी एकाकी झुंज देऊन 172 इतक्या प्रचंड मते घेतले एकूण 470 मता पैकी नऊ मते बाद झाली उर्वरित 289 मध्ये घेऊन सर्वपक्षीय उमेदवार शिवाजी कांबळे हे विजयी झाले तरीही विजयी उमेदवाराचे विजय जल्लोष साजरा केला लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा व्हायला पाहिजे होता पण झाला नाही मागासवर्गीय एका जागेसाठी संपूर्ण गाव एकत्र येऊन निवडणूक लावली खरी पण निकालानंतर सर्वजण चुप्पी साधून होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आर एस गायकवाड यांनी विजयी उमेदवार शिवाजी कांबळे यांचा भव्य असा सत्कार आयोजित करून लोकशाहीचा उत्सव साजरा केला यावेळी शिवाजी कांबळे यांना शुभेच्छा दिल्या अनेक कर्तव्याची ही जाणीव करून दिली वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष मारुती बनसोडे,जिल्हा संघटक परमेश्वर लोखंडे, तुळजापूर तालुकाध्यक्ष अंकुश लोखंडे, तुळजापूर तालुका महासचिव गोविंद भंडारे, उमरगा येथील वंचित चे कार्यकर्ते ज्ञानदेव बनसोडे,प्रगतशील शेतकरी बापू बोंगरगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते