डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष पदी मारूती लोंढे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष पदी मारूती लोंढे
वागदरी/न्यूज सिक्सर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी येडोळा ता.तुळजापूर च्या अध्यक्ष पदी मारूती लोंढे यांची निवड करण्यात आली आहे.
तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथे सिध्दार्थ कला व क्रिडा मंडळाच्या पुढाकारातून समस्त समाज बांधवांची एक बैठक संपन्न झाली.या बैठकीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीची निवड करण्यात आली असून सर्वानुमते जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष पदी येथील युवा कार्यकर्ते मारुती लोंढे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी- सुरेश लोंढे, कोषाध्यक्ष- भानुदास लोंढे, सचिव – देवानंद लोंढे आदींची निवड करण्यात आली व सिध्दार्थ क्रीडा व युवक मंडळाच्या अध्यक्ष पदी – प्रवीण कांबळे, उपाध्यक्ष -गोवर्धन लोंढे – सचिव -अक्षय लोंढे, कोषाध्यक्ष – अभिषेक लोंढे यांची निवड करण्यात आली. तसेच
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ जयंती निमित्त ध्वजारोहण,प्रबोधनपर भिमगीत गायण,व्याख्यान आदीसह विविध कार्यक्रम आयोजित करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतमेची सह वाद्य भव्य मिरवणूक काढून या जयंती उत्सवाची सांगता करण्याचे या बैठकीत ठरले.
यावेळी सुरेश लोंढे, देवानंद लोंढे, अमित लोंढे, प्रविण कांबळे, लक्ष्मण लोंढे,अक्षय लोंढे, डॉ. सुरज लोंढे सह कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.