गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून एकाचा खून

आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून एकाचा खून
परंडा /न्यूज सिक्सर
माळी वस्ती, सावदरवाडी ता. परंडा येथील- बाबुराव बब्रु काळे, यांनी आर्थिक व्यावहारच्या कारणावरुन दि.04.04.2023 रोजी 16.30 ते 17.00 वा. सु. सावदरवाडी शिवारातील शेत गट नं 75 येथे मिटमिटा, ता. औरंगाबाद येथील- गोल्या ऊर्फ गोलु आनंदराव काळे, वय 22 वर्षे यांना पोटात चाकूने मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या चंदा कांतीलाल पवार, रा. सावदरवाडी, ता. परंडा यांनी दि. 05.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.