ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव देण्याचा सातत्याने प्रयत्न करणार-चेअरमन दत्ता (भाऊ) शिंदे

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव देण्याचा सातत्याने प्रयत्न करणार-चेअरमन दत्ता (भाऊ) शिंदे
धोत्री /न्यूज सिक्सर
एका साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून शेतकऱ्यांच्या सतत संपर्कात राहून त्यांचा विश्वास संपादन करून कारखानादार आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य वजन आणि योग्य भाव देवून त्याची बिल वेळेवर देण्याचा सातत्याने प्रयत्न करणार,असे प्रतिपादन गोकुळ शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन दत्ता भाऊ शिंदे यांनी आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
धौत्री (जिल्हा सोलापूर) येथे दि.४ एप्रिल २०२३ रोजी गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलीत गोकुळ साखर कारखान्याच्य गळीत हंगामाचा सांगता समारंभाचे व शेतकरी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गोकुळ साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून दत्ता भाऊ शिंदे हे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणालेकी सन २०२२-२०२३ या गळती हंगामात सोलापूर सह अक्कलकोट, तुळजापूर, उमरगा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गोकुळ साखर कारखान्यास गाळपासाठी ऊस दिला म्हणूनच या हंगामात या साखर कारखान्याने पाच लाख २५ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे.याचा मला सार्थ अभिमान असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला की कारखानादारालाही कामकरण्याची प्रेरणा मिळते.शेतकरी सुखी तर कारखानादार सुखी हे सुत्र समोर ठेवून आमच्या साखर कारखान्याची वाटचाल सुरू आहे.
यावेळी उपस्थित अनेक शेतकऱ्यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गोकुळ साखर कारखान्याचे मँनेजिंग डायरेक्टर कपिल भैय्या शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आभिष्ठ चिंतन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत चांगल्याप्रकारे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रवेश द्वारात प्रवेश केल्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांचे गांधी टोपी व टावेल देऊन स्वागत करण्यात आले.स्वादिष्ट स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी जेष्ठ नेते बलभीम शिंदे,अनिल तानवडे, तुळजभवानी साखर कारखाना नळदुर्गचे चेअरमन सुनील चव्हाण, विशाल शिंदे,युवा कार्यकर्ते रणवीर चव्हाण सह सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर, उमरगा तालुक्यातील नेते, कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.