शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मा.पर्यावरण मंत्री मा.रामदास कदम यांनी आई तुळजाभवानीची सपत्नी दर्शन घेतले.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मा.पर्यावरण मंत्री मा.रामदास कदम यांनी आई तुळजाभवानीची सपत्नी दर्शन घेतले.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलदैवत आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक अभिषेक महापुजा दि. ४ एप्रील रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान श्री तुळजा भवानी मातेची प्रतिवर्षाप्रमाणे शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सह पत्नी देविस अभिषेक पुजा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्रातील कष्टकरी,गोरगरीब,जनतेची व शेतकरी हिताचे कार्य घडोत असे देविस घातले साकडे. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांनी शाल श्रीफळ देविची प्रतिमा देऊन रामदास कदम कुटूंबाचा सत्कार केला. यावेळी राज्यभरातील क्षत्रिय कदम मराठा परिवारचे अध्यक्ष अमरराजे कदम , तुळजाभवानी मातेचे पुजारी मंडळाचे अमरराजे कदम – परमेश्वर, गणेश कदम,डाॅ.सतीश कदम,सुनिल नागणे,अतुल मलबा कदम,विशाल सोंजी कदम,संकेत पाटिल,निलेश कदम,सचिन कदम,तुषार भोसले, सौरभ जाधव, संजय बर्वे मयूर दाते आकाश आहेर संजय बर्वे आदींसह कदम परिवार आदि उपस्थित होते.