आगीमध्ये काढलेली ज्वारी व गहू जळून खाक,शेतकऱ्याचे मोठे नुकसान

आगीमध्ये काढलेली ज्वारी व गहू जळून खाक,शेतकऱ्याचे मोठे नुकसान
धाराशिव /न्यूज सिक्सर
शेतामध्ये काढून ठेवलेली ज्वारी व गहू या पिकास अचानकपणे आग लागली. त्यामुळे त्या आगीत कंसासह ज्वारी व गहू पूर्णपणे भस्मसात झाला आहे.
धाराशिव तालुक्यातील झरेगाव येथील चंद्रकांत रंगनाथ सारफळे यांचे शेत गट क्रमांक ९२ मध्ये अडीच एकर क्षेत्र आहे. त्या शेतामध्ये असलेली ज्वारी व गहू काढून ठेवलेले होते. मात्र या पिकास अचानक आग लागली. त्या लागलेल्या आगीमध्ये काढून ठेवलेली ज्वारीच्या कणसाह कडबा व गहू पूर्णपणे जळून खाक झाला आहे. वर्षभर आपला संसाराचा गाडा हाकण्यासाठी शेतकऱ्याने राबराब राबवून पिकविलेले धान्य क्षणात जळून राख झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची आर्थिक मदत करुन दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी सारपळे यांनी केली आहे.
ज्वारीसाठी ४ पाणी तर गहू या पिकास ८ पाणी दिलेली होती. तसेच गावरान खताने जमीन पूर्णपणे माकली होती. त्यामुळे पीक जोमदार आले होते. मात्र लागलेल्या आगीमध्ये ते पूर्ण जळून खाक झाल्यामुळे माझे वर्षभराचे स्वप्न जळून खाक झाले आहे. तर पीक जळाल्याने माझे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे मायबाप सरकारने आम्हाला आधार मिळावा यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करून आर्थिक मदत द्यावी अशी अर्थ मागणी आपदग्रस्त शेतकरी चंद्रकांत सारफळे यांनी केली.