आगामी काळात होणाऱ्या सण उत्सवाचे पार्श्वभुमीवर तुळजापूर पोलीस ठाण्या अंतर्गत पथसंचलन.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

आगामी काळात होणाऱ्या सण उत्सवाचे पार्श्वभुमीवर तुळजापूर पोलीस ठाण्या अंतर्गत पथसंचलन.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कावत,उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग तुळजापूर डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या गणेश उत्सव, शारदीय नवरात्र उत्सव, ईद मिलाद, दिपावली, आदी सह सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावेत, या दरम्यान कुठल्याही जाती धर्मानमध्ये तेढ निर्माण होवू नये. सर्व सण उत्सव सर्व समाज घटकांनी एकत्रीत रित्या आंनदाने साजरे करावेत. यासाठी जलद कृती बल (रॅपीडॅक्शन फोर्स) व तुळजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदारासह शहरात पथसंचलन करण्यात आले. दि.२५ ऑगस्ट रोजी १०:३० ते ११ : ३० वाजण्याचे दरम्यान पोलीस स्टेशन तुळजापूर व आर पी एफ( रॅपिडक्शन फोर्स ) यांनी संयुक्तरीत्या आगामी सण उत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जुने बस स्थानक, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते दीपक चौक ते भवानी रोड ते आर्य चौक ते कमान वेस ते मलबा हॉस्पिटल ते पोलीस स्टेशन या मार्गे रूट मार्च काढण्यात आला. यावेळी तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे , सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चासकर, पोलीस उपनिरीक्षक कल्याण पवार तसेच पोलीस ठाण्यातील २० पुरुष व महिला अंमलदार, तसेच आर पी एफ चे २ दोन अधिकारी व ६० जवानांनी रूट मार्चमध्ये सहभाग घेतला.