ब्रेकिंगमहाराष्ट्र
मंगरूळ येथील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण काम सुरू
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

मंगरूळ येथील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण काम सुरू
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील दलित वस्ती येथे पक्का रस्ता नव्हता. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.या रस्त्याची ग्रामपंचायत सदस्य प्रशांत आप्पा जेष्ठीथोर यांनी पाहणी करून सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकामासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रयत्न केल्याने रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू झाले असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. गुरुवारी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत आप्पा जेष्ठीथोर यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली.