श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र यात्रेला आजपासून प्रारंभ, पार्किंग शेजारी अणारे भवाणी कल्लोळ तिर्थ खुले ! बसच्या भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होण्याचे संकेत
श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र यात्रेला आजपासून प्रारंभ, पार्किंग शेजारी अणारे भवाणी कल्लोळ तिर्थ खुले ! बसच्या भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होण्याचे संकेत

श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र यात्रेला आजपासून प्रारंभ, पार्किंग शेजारी अणारे भवाणी कल्लोळ तिर्थ खुले !
बसच्या भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होण्याचे संकेत
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजा भवानी देवीच्या चैत्र महिन्यात भरणाऱ्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होण्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून मिळाले आहेत महिलांचे दाग दागिने चोरी होण्याचे प्रमाण वाढू शकते या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने महिलांना दागिरे सांभाळण्याचे आवाहन यात्रेच्या निमित्ताने केले आहे. वाढती भाविक संख्या लक्षात घेऊन प्राधिकरणांमधून निर्माण केलेले पार्किंग शेजारी असणारे कल्लोळतीर्थ यात्रेमुळे स्नानासाठी सज्ज बनवले आहे.
श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्री यात्रेनिमित्ताने ए 7 एप्रिल या कालावधीत मोठी भाविकांची गर्दी असणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान पोलीस प्रशासन नगरपरिषद प्रशासन आरोग्य विभाग प्रशासन यांच्याकडून यात्रेच्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्यात आली आहे यावर्षी मोठ्या संख्येने महिलांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज पोलीस प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने महिलांना प्रवासामध्ये ५० टक्के सवलत दिलेली असल्यामुळे यावर्षी महिलांची संख्या वाढेल असा अंदाज नोंदविलेला आहे या अनुषंगाने महिला पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे बस स्थानक परिसर मंदिर परिसर भवानी रोड नळदुर्ग रोड धाराशिव रोड सोलापूर रोड लातूर रोड या सर्व मार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय देखील झालेला आहे.शहरातील वाहतूक जलद गतीने होण्यासाठी मुख्य रस्त्यावर बॅकेटिंग लावून चार चाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या काळात मंदिर २२ तास दर्शनासाठी खुले राहणार आहे रात्री एक वाजता चरणतीर्थ पूजा होणार आहे असे मंदिर समितीने यापूर्वी जाहीर केले आहे यात्रेच्या निमित्ताने सर्व खाते प्रमुखांची बैठकीपूर्वी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मंदिर परिसरात भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंडप उभारणी करण्यात आली आहे या यात्रेच्या काळात भाविकांची संख्या लक्षात घेऊन दर्शन रांगा आणि अभिषेक रांगात जलद गतीने चालाव्यात यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. व्यापारी वर्गासाठी ही यात्रा खूप महत्त्वाची असते या यात्रेदरम्यान होणारा व्यवसाय व्यापाऱ्याच्या वर्षभराच्या अर्थकारणावर परिणाम करणारा असतो त्यामुळे प्रशासनाने सर्व बाजारपेठेमध्ये भाविकांची रेलचेल राहील याची खबरदारी घ्यावी अशी तुळजापूरकरांची मागणी आहे.
तुळजापूर शहरातील हदवाढ भागातील राहिवासी असलेल्या घर मालकांनी कुलूप लावून बाहेर जाताना मौल्यवान वस्तू घरात ठेऊ नयेत व अनोळखी व्यक्ती कॉलोनी मध्ये आल्यास त्याची विचारपूस करावी.
पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद
पोलिस ठाणे, तुळजापूर