उमरग्यात 75 बळीराजांचा पुरस्कार देऊन गुणगौरव

उमरग्यात 75 बळीराजांचा पुरस्कार देऊन गुणगौरव
उमरगा/न्यूज सिक्सर
येथील शांतिदूत परिवार महाराष्ट्र च्या वतीने ओम लोन्स गुलबर्गा रोड उमरगा या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील लोहारा उमरगा तालुक्यातील विशेष कार्य करणाऱ्या शेतीत राबणाऱ्या शेतीमध्ये विविध सेंद्रिय शेतीचे प्रयोग करून शेती विकसित करून कष्टाने जमीन पिकविणाऱ्या बळीराजाला भारत देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 शेतकऱ्यांना प्रमाणपत्र, मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
शांतिदूत परिवार महाराष्ट्राचे मार्गदर्शक आयपीएस माझी पोलीस कमिशनर विठ्ठलराव विठ्ठलराव जाधव सोबत शांतीदुत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्याताई जाधव डॉ. तुकाराम मोटे कृषी सह संचालक महाराष्ट्र राज्य, विजय ठूबे राष्ट्रिय अध्यक्ष शेतकरी शांतीदूत परिवार , विजय बोत्रे महाराष्ट्र अध्यक्ष, विकास देशमुख कार्याध्यक्ष महाराष्ट्र शेतकरी शांतीदूत परिवार,बालाजी शेवाळे तहसीलदार पुणे, अशोक क्षीरसागर अति. पोलीस अधिक्षक से. नि, मनोज राठोड पोलीस निरीक्षक उमरगा ,दिपक जवळगे, संजय मुटकुळे जैन इरिगेशन कार्यक्रम अध्यक्ष
यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शेतकरी गुणगौरव मेळावा संपन्न झाला. याच कार्यक्रमांसोबत शेतीतील उत्पादने याचे स्टॉल लावून त्याची विक्री ठेवण्यात आली होती. बळीराजाच्या शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे त्याचा सन्मान व्हायला पाहिजे कौतुक व्हायला पाहिजे म्हणून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शालेय शिक्षणाचे साहित्याचे वाटप करण्यात आले.सोबत रक्तदान शिबिराचे आयोजन करून डॉक्टर पतंगे साहेब यांची टीम यांनी प्रथमोपचार आणि रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आला त्याच सोबत बळीराजा कवी संमेलनाचे आयोजन करून बळीराजाच्या सुखदुःखाच्या भावना विवंचना या बळीराजा काव्यसमिलांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आल्या. रसिकांनी या कवी संमेलनाला भरभरून प्रतिसाद दिला. त्यासोबत विद्यामंदिर धानोरी तालुका लोहारा येथील लाठीकाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रात्यक्षिके करण्यात आली. तर सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे याचेही प्रयोग शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. हा सर्व कार्यक्रम घेण्यासाठी शांतिदूत परिवाराचे मार्गदर्शक विठ्ठलराव जाधव भूमिपुत्र वाघ, प्रसाद पवार, पत्रकार इसुफ मुल्ला, जीवन जाधव, बाबा जाफरी, हरीश सर, किशोर औरादे, प्रा. प्रसाद पवार यांनी परिश्रम घेतले.यांनी. कार्यक्रमाला परिसरातील एक हजार शेतकऱ्यांनी हजेरी लावली…..